शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020 :अर्थसंकल्पात केवळ आकड्यांची चलाखी : अतुल लोंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 23:11 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेली आकडेवारी वास्तविकतेशी मेळ खात नाही. आयकरप्रणाली अधिक गुंतागुंतीची करून सामान्यांना संभ्रमात टाकले आहे. मंदीतील अर्थव्यवस्था झाकोळण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याची टीका अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे यांनी येथे केली.

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय विश्लेषण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लांबलचक अर्थसंकल्प मांडून अर्थव्यवस्था सक्षम असल्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणातून सामान्य नागरिकांना काहीच बोध झाला नाही. आकड्यांची चलाखी करून वास्तविक अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडलाच नाही. त्यांनी मांडलेली आकडेवारी वास्तविकतेशी मेळ खात नाही. आयकरप्रणाली अधिक गुंतागुंतीची करून सामान्यांना संभ्रमात टाकले आहे. मंदीतील अर्थव्यवस्था झाकोळण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केल्याची टीका अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे यांनी येथे केली.धनवटे नॅशनल महाविद्यालय अल्युमिनी असोसिएशन आणि युवा जागर यांच्यावतीने विमलाताई देशमुख हॉल, धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर येथे आयोजित अर्थसंकल्पीय विश्लेषणात्मक भाषणात लोंढे यांनी अर्थसंकल्पातील उणिवा आणि काही चांगल्या योजनांची फोड केली. यावेळी धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय अल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे आणि कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते.अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पपूर्व पाहणीत मोठा विसंवादलोंढे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवालातील तरतुदींमध्ये मोठा विसंवाद दिसून येत आहे. आयातीवर मोठ्या प्रमाणावर कर व निर्बंध लादून एकप्रकारे जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे दरवाजे आपण बंद करीत आहोत. आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे की केवळ आपली स्पर्धा पाकिस्तानशी राहणार आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून देशाच्या संरक्षण खर्चावरील तरतूद कमी कमी होत आहे. यावर्षीही कमी करण्यात आली. संरक्षण व्यवस्थेत राज्यांनीही खर्च उचलावा, असे सांगण्यात आले आहे. देशात शैक्षणिक खर्च सात लाख कोटी असायला हवा होता. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात केवळ ९९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रावरही फारशी तरतूद केली नाही. त्यामुळे गरीब व सामान्यांच्या अपेक्षा अशा तरतुदींमुळे कशा पूर्ण होणार, हा मोठा प्रश्न आहे. तोट्यात गेलेल्या वित्तीय संस्था वाचविण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसून येत असल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले.निर्गुंतवणुकीचा विषय गुंतागुंतीचासरकारने अनेक निर्णय अर्थसंकल्पबाह्य घेतलेले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. कराच्या सुलभीकरणाऐवजी ती गुंतागुंतीची झाली आहे. निर्गुंतवणुकीचा विषयही अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. एलआयसी, एअर इंडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची निर्गुंतवणूक सरकार करीत आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे लोंढे म्हणाले. लोंढे यांनी विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरे दिली.

टॅग्स :budget 2020बजेटEconomyअर्थव्यवस्था