शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बुद्ध विहारांना एकसूत्रात बांधणार

By admin | Updated: April 2, 2016 03:28 IST

बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बौद्धांची शिखर संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न : बुद्ध विहार समन्वय समितीचा पुढाकारनागपूर : बौद्ध समाजाला एकासूत्रात बांधण्यासाठी राज्यभरातील बुद्ध विहारांना, सामाजिक संस्थांना व कार्यकर्त्यांना एकासूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत नागपुरातून याची सुरुवात झाली असून आतापर्यंत नागपुरातील २०० विहारांना परिषदेच्या माध्यमातून जोडण्यात यश आले आहे. या माध्यमातून बौद्ध समाजाची एक शिखर संस्था स्थापन करण्याचा उद्देश आहे. बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोक सरस्वती यांनी सांगितले की, धम्म क्रांतीनंतर जमेल तसे आपण बुद्ध विहार बांधलेत. प्रशिक्षणाच्या व निर्देशनाच्या अभावामुळे त्यात अनवधानाने अनेक त्रुटी राहून गेल्या. त्यात कुणाचाच दोष नव्हता. त्याला कालमानाच्या मर्यादा होत्या. त्या त्रुटींना दुरुस्त करण्याची गरज सर्वांनाच जाणवत आहे. परंतु सर्वसामान्य नेतृत्वाच्या अभावामुळे कुणी कुणाला सांगावे आणि कुणी कुणाचे ऐकावे हा गहन प्रश्न निर्माण झाल्याने समाजात गोंधळ, भ्रम, कलह निर्माण झाला. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या बुद्ध विहारांचा समन्वय करून त्याची नियंत्रण करणारी केंद्रीय यंत्रणा असलेली शिखर संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन करण्यात आली. २०२० पर्यंत राज्यातील सर्व विहारांची व धम्म प्रचारकांचा समन्वय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. २०१४ पासून कामाला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी नागपूर शहरातील ७० विहारांचा समन्वय स्थापन करण्यात आला. दुसऱ्या वर्षी १२५ आणि यावर्षी २०० विहारांचा समन्वय स्थापन झालेला आहे. २०१७ पर्यंत संपूर्ण नागपूर शहर, २०१८ पर्यंत संपूर्ण जिल्हा, २०१९ पर्यंत विदर्भ आणि २०२० पर्यंत संपूर्ण राज्यातील विहिरांचा समन्वय केला जाईल. यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी बुद्ध विहारांची समन्वय परिषद स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बुद्ध विहार समन्वय परिषद आजपासून रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह हिंदी मोरभवन झाशी राणी चौक सीताबर्डी येथे दोन दिवसीय बुद्ध विहार समन्वय परिषद आयोजित करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता परिषदेला सुरुवात होईल. सकाळी ११.३० वाजता माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदंत विमलकिर्ती गुणसिरी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. कृष्णा कांबळे, अशोक शंभरकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध विषयावर चर्चा होईल.