शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बुद्ध धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट : किरण रिजीजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 21:42 IST

तथागत बुद्धांनी दिलेला शांती, मैत्री, करुणेचा संदेश हा संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी येथे केले.

ठळक मुद्देड्रॅगन पॅलेस येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म भारतात झाला असला तरी तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हे संपूर्ण जगाने अंगीकृत केले आहे. तथागत बुद्धांनी दिलेला शांती, मैत्री, करुणेचा संदेश हा संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी येथे केले.कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे होत्या. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी होते. तसेच म्यानमारचे बौद्ध उपासक टेंग ग्यार, थायलंडचे पूज्य भदंत डॉ. परमहा अनेक, तायवानचे शीना हसू, बांग्लादेशचे सुगत आदी प्रामख्याने उपस्थित होते.ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे अतिशय सुंदर असे जागतिक दर्जाचे धम्म बुद्ध विहार आहे. येथे आल्यानंतर मानवाला शांती व समाधान प्राप्त होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट थीम पार्क कन्व्हेंशन सेंटरच्या संकेत स्थळाचे लोकार्पण तसेच सेव्हन वंडर्स आॅफ बुद्धिस्ट वर्ल्ड या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते करण्यात आले.रिजीजू यांनी सर्वप्रथम ड्रॅगन पॅलेस टेंम्ल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटरची सुद्धा पाहणी केली.प्रास्ताविक डांगे गुरुजी यांनी केले. संचालन वंदना भगत यांनी केले. तर दीपंकर गणवीर यांनी आभार मानले.यावेळी अजय कदम, नंदा गोडघाटे, सुुभाष सोमकुवर, उदास बन्सोड, नियाज कुरेशी, नितीन गजभिये, अशपाक कुरेशी, रेखा भवे, प्रवीण निखाडे, दीपक सिरीया, राजू भागवत, मनोहर गणवीर, नारायण नितनवरे, सावला सिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिर