शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बसपाला खिंडार !

By admin | Updated: June 29, 2015 02:53 IST

बहुजन समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने व विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातील बसपाचे

सुरेश माने, गजभिये यांचा राजीनामा : दुसरा पक्ष काढण्याचे संकेत नागपूर : बहुजन समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने व विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातील बसपाचे उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत केली. २६ जुलै रोजी आरक्षण दिवसानिमित्त नाशिक येथे दोन दिवसीय परिषद आयोजित करून तीत पुढील राजकीय वाटचालीची भूमिका जाहीर केली जाईल. कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे स्पष्ट करीत एक नवा पक्ष काढण्याचे संकेत त्यांनी दिले. अलीकडच्या काळात बसपातील ही मोठी बंडखोरी मानली जात आहे. डॉ. सुरेश माने व किशोर गजभिये यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी बसपामधून निलंबित करण्यात आले होते. या घडामोडीनंतर डॉ. माने व गजभिये यांनी रविवारी प्रसिद्धी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. डॉ. माने म्हणाले, आपण महाराष्ट्र प्रभारी म्हणून बसपाचा ग्राफ वाढविला. राज्यात बसपाची अधोगती थांबविण्यासाठी आपण राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना पाच पानांचे पत्र लिहून काही पावले उचलण्याची विनंती केली. मात्र, या पत्रावर काहीच झाले नाही. अशात भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही जिल्ह्यात बसपाला चांगली मते मिळाली होती. असे असतानाही ७ जून रोजी प्रदेशाध्यक्षांनी मायावती यांच्या आदेशाचा हवाला देत गोंदिया, भंडाऱ्यात निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय मान्य न करता स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुजन समाज परिषदे(बसपा)च्या बॅनरखाली अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण २६ जून रोजी भंडाऱ्यात गेलो व त्यानंतर आपल्याला पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे वृत्त वाचायला मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण कांशीरामजींचे अनुयायी आहोत. त्यामुळे आंबेडकरी विचार सोडणार नाही. बसपा, बामसेफ यासह विविध आंबेडकरी संघटना व इतर पक्षातून येणाऱ्यांना एकत्र करून २०१६-१७ मध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. किशोर गजभिये म्हणाले, आपण पदवीधर मतदारसंघ निवडणूक व त्यानंतर उत्तर नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढविली. चांगली मते घेतली. मात्र, त्यानंतरही पक्षातून का निलंबित करण्यात आले याचे कारण कळले नाही. पक्षाच्या सर्व बैठकांना आपण नियमितपणे उपस्थित राहिल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)गोंदिया- भंडाऱ्यात न लढण्यामागे अर्थकारणगोंदिया व भंडारा जिल्ह्यात विधानसभेत बसपाला चांगली मते मिळूनही जि.प.ची निवडणूक न लढण्याचा निर्णय बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केला. या मागे राजकारण व अर्थकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेत बसपाचे गजभिये यांच्यामुळे उत्तर नागपुरात एका दिग्गज नेत्याचे नुकसान झाले. तसेच नुकसान भंडारा- गोंदियातही झाले. त्यामुळे भंडारा- गोंदियात बसपाचे उमेदवार न लढविण्यामागे या ‘शक्तींचा’ही हात असू शकतो, असा सांकेतिक आरोपही डॉ. माने यांनी केला.