शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

महापुरुषांच्या विचारांसाठी बसपाच पर्याय

By admin | Updated: January 16, 2015 01:00 IST

या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून

जनकल्याणकारी दिवस : किशोर गजभिये यांचे प्रतिपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालविले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या विचारांद्वारे चालत असून विविध समाजाच्या महापुरुषांच्या विचारांना पुढे नेऊन या देशाचा विकास साधायचा असेल तर देशात केवळ बसपा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बसपाचे प्रदेश महासचिव किशोर गजभिये यांनी येथे केले. बसपातर्फे गुरुवारी जन कल्याणकारी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, सचिव डॉ. रमेश जनबंधू, दादाराव ऊईके, उत्तम शेवडे, झेड. आर. दुधकुवर, राजीव बसवनाथे, दत्तराव धांडे प्रमुख अतिथी होते. नगरसेवक किशोर गजभिये, संजय जैस्वाल, मनिषा घोडेस्वार, ललिता पाटील, सत्यभामा लोखंडे, गौतम पाटील, दिलीप रंगारी आदी व्यासपीठावर होते. किशोर गजभिये म्हणाले, बसपा ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी राजकीय पार्टी आहे. त्यामुळे मायावती यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा सर्वांगीण विकास झाला.मायावती यांनी पहिल्यांदाच सर्व समाजातील महापुरुषांना यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या देशात भाजप हा सत्तेत आहे. काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे. अशा परिस्थितीत केवळ बसपाच भाजपला पर्याय आहे. तेव्हा महापुरुषांच्या विचारांनी हा देश चालवायचा असेल तर बसपाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.कृष्णा बेले यांनी उत्तर प्रदेशात बसपाच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कल्याणकारी कामाची माहिती दिली. उत्तर प्रदेशात ५० वर्षात जे झाले नव्हते. ते मायावती यांनी करून दाखविले. राज्याच्या विकासासोबतच त्यांनी महापुरुषांचे कार्यही जगासमोर आणण्याचे काम केले. त्यांचे स्मारक उभारून त्यांचा सन्मान केला. प्रास्ताविक विश्वास राऊत यांनी केले. संचालन प्रा. भाऊ गोंडाणे यांनी केले. तर राजकुमार बोरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)