शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अमरावतीच्या घटनेने बसपा नेते हादरले ; मुख्य प्रभारी राजभर यांचा दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 20:39 IST

अमरावती येथे बसपाच्या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप करीत कार्यकर्ते नेत्यांच्या अंगावर धावून गेले. काहींना मारही खावा लागला. बसपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेचा धसका घेतला असून विदर्भातील सर्व बैठका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राजभर यांनी आपला दौराही रद्द केला आहे.

ठळक मुद्देविदर्भातील आढावा बैठकी पुढे ढकलल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती येथे बसपाच्या आढावा बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात गैरप्रकार केल्याचा आरोप करीत कार्यकर्ते नेत्यांच्या अंगावर धावून गेले. काहींना मारही खावा लागला. बसपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेचा धसका घेतला असून विदर्भातील सर्व बैठका तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राजभर यांनी आपला दौराही रद्द केला आहे.निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार बसपात नवा नाही. परंतु यंदा पहिल्यांदाच हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सामान्य कार्यकर्ते उघडपणे नेत्यांना जाब विचारत आहेत. अमरावतीतील घटनाही यातलाच प्रकार आहे. या बैठकीला बसपाचे प्रदेश प्रभारी संदीप ताजणे, श्रीकृष्ण बेले, प्रमोद रैना आणि अमरावतीचे मनपा गटनेते चेतन पवार उपस्थित होते. त्यांना सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यापूर्वी नागपुरातील एका बैठकीतही असाच काहीसा प्रकार झाला. नागपुरातील बसपाचे लोकसभेचे उमेदवार मो. जमाल यांना पक्षातून काढण्यात आले. त्यांनी निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. परंतु मो. जमाल यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीच पक्षविरोधी कार्य केल्याचा थेट आरोप केला होता. अलीकडेच नागपूर शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दलही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. एकूणच बसपामध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. हा रोष अमरावतीत दिसून आला. नागपुरात त्याचे पडसाद अधिक तीव्रतेने उमटण्याची भीती लक्षात घेता २२ जूनपासून होणाऱ्या विदर्भातील आढावा बैठकीच रद्द करण्यात आल्या आहेत.शनिवारपासून होता दौराविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील झोननिहाय आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. २२ तारखेला वर्धेपासून या बैठकी होणार होत्या. २३ जून रोजी नागपूर, २५ जून औरंगाबाद, २६ जून मुंबई, २७ जून नाशिक अशा या बैठकी होणार होत्या. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी रामअचल राजभर हे स्वत: मार्गदर्शन करणार होते. रामअचल राजभर हे बसपाचे राष्ट्रीय महासचिव असून ते उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. परंतु आता त्यांचा दौरा रद्द झाला आहे. याबाबत बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांना विचारणा केली असता त्यांनीही दौरा रद्द झाल्याचे सांगितले. परंतु अमरावतीच्या घटनेशी याचा संबंध नाही. हा दौरा परवाच रद्द झाला. मायावती यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना लखनौला बोलावल्याने विदर्भातील बैठका रद्द झाल्याचे शेवडे यांचे म्हणणे होते. परंतु पक्षातील सूत्रांनुसार अमरावतीच्या घटनेमुळे नते हादरले आहेत. त्यामुळेच हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी