शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या अभियंत्याची आत्महत्या

By admin | Updated: March 5, 2017 02:02 IST

बुधवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधील विभागीय अभियंता

नागपूर : बुधवारपासून अचानक बेपत्ता झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मधील विभागीय अभियंता गणेश पांडूरंग बारवदे (वय ५०, रा. हिंदुस्तान कॉलनी) यांचा त्यांच्याच कार्यालयात मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. सेमिनरी हिल्सच्या टीव्ही टॉवरजवळ भास्कर भवन असून तेथे रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर आहे. बारवदे यांच्याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ड्युटी निश्चित करण्याची जबाबदारी होती. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास बारवदे यांनी त्यांच्या वरिष्ठांना बँकेचे काम आटोपून येतो, असे सांगितले. सायंकाळ झाली तरी कार्यालयात ते दिसले नाही. त्यानंतर घरीही ते पोहचले नाही, त्यामुळे घरच्या मंडळींनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडे चौकशी केली. अचानक ते बेपत्ता झाल्यामुळे पत्नीने बुधवारी रात्री अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. दीड दिवस होऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने अस्वस्थ झालेल्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल ट्रॅकिंगवर टाकला असता गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या मोबाईलचे लोकेशन कार्यालयीन परिसरातच दिसल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनाही बोलावून घेण्यात आले. कार्यालयाची कुलिंग सिस्टीम रूम उघडली असता त्यात ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. गुरुवारी मध्यरात्री १२.३० ला ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रसाद प्रभाकर सुपेकर (वय ५५, प्रणव अपार्टमेंट, व्यंकटेशनगर, खामला) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या आत्महत्या प्रकरणाची बीएसएनएलमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलीस चौकशी करीत आहेत.(प्रतिनिधी)