शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कपिलनगरात तरुणाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चाकूचे सपासप घाव घालून एका आरोपीने एका तरुणाची निर्घृण हत्या केली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चाकूचे सपासप घाव घालून एका आरोपीने एका तरुणाची निर्घृण हत्या केली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा क्वॉर्टरजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.

पाजी ऊर्फ अमनदीपसिंग कुलदीपसिंग (२३) असे मृताचे नाव आहे. तो गुरू तेगबहादूरसिंह नगरात राहत होता. तो एका बसवर क्लिनर म्हणून काम करायचा, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाजी (अमनदीपसिंग) त्याच्या म्हाडा क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका मित्राला नेहमी भेटायला यायचा. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ९.४५ च्या सुमारास तो मित्राच्या रूमकडे आला. त्या भागात आरोपीचा अमनदीपसिंग सोबत वाद झाला. त्यानंतर त्याच्यावर चाकूचे सपासप घाव घालून आरोपीने सिंगची हत्या केली. त्याची माहिती कळताच कपिलनगरचे ठाणेदार अमोल देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळाकडे धावले. पोलीस उपायुक्त नीलोत्पल हे देखिल पोहचले. त्यांनी अमनदीप सिंगचा मृतदेह रुग्णालयात रवाना केला. परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली तेसुद्धा वृत्तलिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.

---

मित्राच्या रूमला कुलूप

अमनदीप सिंग ज्या मित्राकडे भेटायला येत होता. त्या मित्राच्या रूमला कुलूप असून, त्याचा फोनही नॉट रिचेबल असल्याने पोलिसांचा संशय वाढला आहे. मध्यरात्रीपर्यंत पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत होते. दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात तणाव वाढला होता.

---