शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरी उशिरा आली म्हणून महिलेचा निर्घृण खून; नागपुरातील वाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:38 IST

घरी परत येण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या तरुणाने महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करीत तिच्या कपाळावर बत्त्याने वार केले. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील वाडी येथे घडली.

ठळक मुद्देबत्त्याने केले कपाळावर वार

लोकमत न्यूज नेटवर्कवाडी : घरी परत येण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या तरुणाने महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करीत तिच्या कपाळावर बत्त्याने वार केले. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, दोघेही काही दिवसांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री उघडकीस आली.अलका टेंभेकर (२८) असे मृत महिलेचे नाव असून, सिद्धार्थ प्रेमजी सोनपिंपळे (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर नगर, वाडी येथे राहायचे. अलका बुधवारी सकाळी सिद्धार्थला न सांगता बाहेर गेली होती. तिला घरी परत यायला उशीर झाल्याने तो चिडला होता. संशयी स्वभावाच्या सिद्धार्थने तिला उशिरा येण्याचे कारण विचारत तिच्याशी भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास गेल्याने त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.एवढेच नव्हे तर त्याने तिच्या कपाळावर बत्त्याने वार करून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेतील अलका गतप्राण होताच सिद्धार्थने तिथून पळ काढला. दिवसभर दारू पिऊन तो फिरत राहिला. त्यानंतर त्याने रात्री १० वाजताच्या सुमारास स्वत: पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून अलकाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शिवाय, घटनास्थळाहून काही साहित्य जप्त करून सिद्धार्थला अटक केली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ व सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी घटनास्थळावर घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपास ठाणेदार राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल लाकडे करीत आहेत.लिव्ह इन रिलेशनशिपअलका ही मूळची भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून ती विवाहित आहे. परंतु ती पतीजवळ न राहता सिद्धार्थसोबत त्याच्या सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर नगर वाडी येथील घरी रहात होती. सिद्धार्थदेखील विवाहित असून त्याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्या दोघांनी अधिकृतरित्या लग्न केले नसले तरी ते आजवर पतीपत्नीसारखेच राहत होते.

टॅग्स :Murderखून