शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर महिला पोलीस अडकली

By admin | Updated: September 20, 2016 02:26 IST

तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस

कारवाईसाठी साडेपाच हजार मागितले : तीन हजार घेताना एसीबीने पकडले नागपूर : तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली. मनीषा अरुण साखरकर (वय ४८) असे तिचे नाव आहे. फिर्यादी संतोषराव पोहनकर मूळचे जबलपूरचे असून सध्या ते कळमन्यात राहतात. त्यांची पीठाची चक्की आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांसोबत पोहनकर यांचा वाद सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारअर्जाची चौकशी हवालदार मनीषा साखरकर हिच्याकडे होती. तिने पोहनकर यांच्याशी संपर्क साधून ५५०० रुपये दिले तरच गैरअर्जदारांवर कारवाई करेन, अशी अट घातली. लाच दिल्याशिवाय कारवाई होणार नाही, असेही बजावले. आधीच त्रस्त असलेल्या पोहनकर यांच्याकडे साखरकर हिने लाचेच्या पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे पोहनकर यांनी एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दराडे यांनी सापळा लावण्याचे निर्देश दिले. ठरल्याप्रमाणे एका पंचासह पोहनकर साखरकर हिच्याकडे गेले. साडेपाच हजार एकमुश्त देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा साखरकर हिने आज तीन हजार द्या, नंतर अडीच हजार द्या, असे सांगितले. त्यानुसार, पोहनकर लाचेचे तीन हजार आणि एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सोमवारी दुपारी १.३० वाजता कळमना ठाण्यात गेले. लाचखोरीसाठी चर्चित एसीबीने लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडलेली मनीषा साखरकर ही महिला पोलीस कर्मचारी कळमना ठाण्यात लाचखोरीसाठी चर्चित होती. तिच्याकडे आलेल्या तक्रार अर्जाशी संबंधित (फिर्यादी आणि आरोप) व्यक्तींना लाचेसाठी अक्षरश: धारेवर धरायची. सहा महिन्यांपूर्वी तिने अशाच प्रकारे एका गरीब तरुणाला पैशासाठी लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपावरून कारवाईची धमकी दिली होती. त्याच्याकडून चिरीमिरी उकळण्यासाठी तिने त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला होता.