शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

लाचखोर महिला अधिकारी अडकली

By admin | Updated: May 21, 2014 00:55 IST

भूखंड नावावर करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणारी एक महिला अधिकारी आणि तिच्यासाठी लाच स्वीकारणर्‍या दलालाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले.

 भूखंड नामांतरणाचे काम : दोन हजारांसाठी अडवणूक

नागपूर : भूखंड नावावर करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणारी एक महिला अधिकारी आणि तिच्यासाठी लाच स्वीकारणर्‍या दलालाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. वर्षा सुभाष भगत आणि कमल फकिरचंद सुदानी अशी आरोपींची आहेत. वर्षा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात परिरक्षण भूमापक आहे. गजेंद्र देवीदयाल खुंगर (वय ६०) हे वर्धमाननगरात राहातात. अनिल अवचळ (रा. कच्ची विसा भवन, लकडगंज) यांच्या पारडी येथील भूखंडाचे नामांतर करण्यासाठी खुंगर यांनी नगर भूमापन अधिकारी क्रमांक दोनच्या कार्यालयात अर्ज सादर केला होता़ परिरक्षण भूमापक वर्षा सुभाष भगत हिच्याकडे हा अर्ज पुढील कारवाईसाठी आला होता. हे काम करून देण्यासाठी वर्षा भगत हिने खुंगर यांना २ हजारांची लाच मागितली. आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि परवानग्या असतानाही लाचेसाठी अडवून धरणार्‍या वर्षाला धडा शिकविण्यासाठी खुंगर यांनी एसीबीचे अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांची आज भेट घेतली. तक्रार मिळताच अधीक्षक वसंत शिरभाते, हरीश रेड्डीवार, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी ३.१५ वाजता खुंगर यांना लाचेची रक्कम घेऊन वर्षाकडे पाठविली. तिने ती रक्कम कमल सुदानी या दलालाकडे देण्यास सांगितले. सुदानीने रक्कम स्वीकारताच बाजूलाच असलेले पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, अशोक साखरकर तसेच हवालदार विलास खनके, महेंद्र सरपटे, प्रमिल गायकवाड, संतोष पुंडकर, सुभाष तानोडकर, अजय यादव, शेखर ढोक, मधुकर टेकरे, राजेश तिवारी आणि जगदीश गणवीर यांनी वर्षा तसेच सुदानीला जेरबंद केले. (प्रतिनिधी) घरझडती सुरू भ्रष्ट अधिकार्‍यांसाठी दलाली करणारा, त्यांची लाच स्वीकारणारा कमल सुदानी एलआयसी एजंट आहे. तो पारडीच्या सूर्यानगरात राहातो. वर्षा भगत बालाजी नगर, मानेवाडा येथे राहाते. या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने तिच्या घराची झडती सुरू केली. वर करप्शन, खाली अ‍ॅन्टी करप्शन ! नगर भूमापन कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आहे. येथे आणि या इमारतीतील अनेक कार्यालयात खुलेआम लाचेचा कारभार (करप्शन) चालते. आपल्या खालीच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे (अ‍ॅन्टी करप्शन) कार्यालय आहे, याचेही त्यांना भान उरलेले नाही. आजच्या या कारवाईतून त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.