शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांना बाप्पाचीही भीती नाही

By admin | Updated: September 23, 2015 06:28 IST

विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उत्सवात सारे भाविक दंगले आहेत. आपल्या पापाची, वाईट कर्माची क्षमा मागून भविष्यात

नागपूर : विघ्नहर्ता श्री गणेशाच्या उत्सवात सारे भाविक दंगले आहेत. आपल्या पापाची, वाईट कर्माची क्षमा मागून भविष्यात कोणतेही वाईट काम हातून घडू नये, अशी याचना सर्वसाधारण भाविक बाप्पाकडे करीत आहेत. मात्र, लाचखोर त्याला अपवाद आहेत. त्यांना बाप्पांचीही भीती नाही. काम घेऊन आलेल्यांकडून चिरीमिरी उकळण्यात ते व्यस्त असतात. अशातीलच एक स्वास्थ्य निरीक्षक आणि एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. मंगळवारी नागपूर आणि रामटेकमध्ये ही कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या हनुमाननगर झोनमध्ये स्वास्थ निरीक्षक असलेला संजय लक्ष्मणराव नगराळे (वय ५३) हा सफाई कामगारांना गैरहजरी लावण्याची धमकी देऊन लाच उकळतो, अशी ओरड होती. सूरज तुरकेल याला २ हजार तर सिध्दार्थ नारनवरे या सफाई कर्मचाऱ्याला नगराळेने धाक दाखवून ४ हजारांची लाच मागितली होती. या दोघांनीही सरळ एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नगराळेची तक्रार केली. त्यावरून जैन यांनी कारवाईचे आदेश दिले.(प्रतिनिधी)पहिल्यांदा दोन तक्रारदारएका लाचखोराविरुद्ध एकाच वेळी दोन जणांनी तक्रार करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. अधीक्षक जैन यांच्या आदेशानुसार सापळा रचण्यात आला. मंगळवारी हुडकेश्वर परिसरात पहाटे ५ च्या सुमारास तुरकेल आणिं नारनवरेने नगराळेला अनुक्रमे २ आणि ४ हजारांची लाच दिली. ती स्वीकारताच पोलीस निरीक्षक आसाराम शेटे,हवालदार विलास खनके, नायक संतोष पुंडकर, चंद्रनाग ताकसांडे यांनी नगराळेच्या मुसक्या बांधल्या.दुसरी कारवाई खुमारीतरामटेक : अतिवृष्टीमुळे घर आणि शेतीचे नुकसान झाल्याने त्याची भरपाई देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मंगळवारी खुमारी (ता. रामटेक) येथे करण्यात आली. दत्तू कामडे (४२, रा. पालोरा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. धनराज शंकर ठाकूर (४७, रा. सत्रापूर) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. बोरडा (सराखा) ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या सत्रापूर येथे त्याचे घर आहे. ७ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ते घर पूर्णत: जमीनदोस्त झाले. तसेच त्याच्याकडील शेत पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची भरपाई म्हणून शासनाकडून दोन धनादेश आले आल्याचे धनराजला सांगण्यात आले. यासाठी त्याने बँकेचे खातेक्रमांक तलाठ्याला दिले. सदर धनादेश मिळावे म्हणून धनराजने तलाठ्याकडे पाठपुरावा केला. दरम्यान तलाठी कामडे याने पाच हजार रुपये दिल्याशिवाय तुझे काम होणार नाही, असे सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले होते.