शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

फर्निचरच्या दुकानात तोडफोड

By admin | Updated: June 1, 2017 02:41 IST

कूलर उधार दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या आरोपींनी फर्निचरच्या दुकानात तोडफोड केली.

कारच्या काचा फोडल्या : आगही लावली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कूलर उधार दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या आरोपींनी फर्निचरच्या दुकानात तोडफोड केली. दुकानमालकाची कार फोडली अन् पेट्रोल टाकून दुकानाला आग लावून दिली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भालदारपुऱ्यात सोमवारी दुपारी ही घटना घडली. भालदारपुरा येथे अब्दुल मतीन रहमान (वय ४८) यांचे महाराजा फर्निचर नामक दुकान आहे. याच भागात राहणारे आरोपी जावेद शकीउल्ला ऊर्फ काजूखान आणि मोहसीनखान शमीऊल्ला ऊर्फ कल्लू हे सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास दुकानात आले. त्यांनी दुकानातील एक कूलर पसंत केला आणि मतिन यांना तो कूलर उधारीत विकत मागितला. मतिन यांनी उधारीवर कूलर देण्यास नकार देऊन पैसे द्या आणि कूलर घेऊन जा, असे म्हटले. त्यामुळे आरोपी चिडले. त्यावेळी वाद घालून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळेने ते परत आले. आरोपींनी यावेळी मतिन यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दुकानात तोडफोड केली आणि यावेळी दुकानात आलेल्या जाफर अंसारी याच्या कारचीही तोडफोड केली. या घटनेची तक्रार नोंदविण्यासाठी मतिन पोलीस ठाण्याकडे जात असल्याचे पाहून आरोपींनी एका बाटलीत पेट्रोल आणले आणि ते दुकानभर शिंपडून आग लावली. परिणामी फर्निचर जळाले. परिसरात तणाव या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जावेद आणि कल्लूला शोधण्यासाठी काही जण परिसरात फिरू लागले. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी फिर्यादी गटातील व्यक्तींना शांत केले. मतिन यांच्या तक्रारीवरून आरोपी जावेद आणि कल्लूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.