नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांचा सफाया करण्यासाठी महापालिका व नासुप्रने मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण करून बांधलेली दुकाने, फुटपाथवर केलेले अतिक्रमण, धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडले जात आहे. नागरिकांकडून होणाऱ्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जात आहे. एकीएकडे ‘मे हीट’चा भडका सुरू असताना दुसरीकडे अतिक्रमण हटावचा धडाका सुरू आहे.घासबाजार झोपडपट्टी हटविलीलकडगंज झोन अंतर्गत पाण्याच्या टाकीजवळ असलेली घासबाजार झोपडपट्टीवर गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा बुलडोझर चालला. तगड्या पोलीस बंदोबस्तात तब्बल १५० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. ही झोपडपट्टी ५० वर्षे जुनी असल्याचे सांगत स्थानिकांनी कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र, पथकाने विरोधाला न जुमानता कारवाई केली. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात अनेकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली. या झोपडपट्टीच्या शेजारी रस्त्यालगत असलेले एक धार्मिक स्थळही तोडण्यात आले. (सविस्तर/२)
अतिक्रमण हटावचा धडाका
By admin | Updated: May 22, 2015 02:39 IST