शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कॅफे सेंटरची भिंत फोडून साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फार्मसीसमोर कॅफे सेंटर लावणाऱ्या तरुणाला धडा शिकविण्यासाठी फार्मसीच्या मालकाने अजब भूमिका घेतली. पान सेंटरच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फार्मसीसमोर कॅफे सेंटर लावणाऱ्या तरुणाला धडा शिकविण्यासाठी फार्मसीच्या मालकाने अजब भूमिका घेतली. पान सेंटरच्या शटरसमोर विटांचा ढिगारा लावला, तर मागच्या बाजूची भिंत फोडून आतमधून चहा आणि ज्यूसच्या मशीनसह दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर, शांतीनगरातील वातावरण गरम झाले.

फिर्यादी शेख अमिर शेख मुख्तियार (वय ३०) हा बेलेनगरात राहतो. त्याने महेशनगरात युनिव्हर्सल फार्मसीसमोर साई पान कॅफे नावाचे दुकान किरायाने घेतले आहे. तेथे तो पान, चहा, ज्यूस आणि कोल्ड्रिंक विकतो. तेथे होणाऱ्या गर्दीमुळे फार्मसीचा मालक दिनेश आनंदराव सोनटक्के (वय ४५) सोबत अमिरचा वाद सुरू झाला. या पार्श्वभूमीवर अमिर त्याचे कॅफे सेंटर बंद करून शनिवारी रात्री १०.३०ला घरी गेला. त्यानंतर, आरोपी दिनेश सोनटक्केने आपल्या साथीदाराच्या मदतीने अमिरच्या दुकानसमोर विटांचा ढिगारा लावला. त्यानंतर, कॅफेची मागची भिंत तोडून चहाची, ज्यूसची मशीन, फ्रीज, दोन फोन, कूलर आणि २५ हजारांची रोकड असे दीड लाखांचे साहित्य चोरून नेले. रविवारी सकाळी ८च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील वातावरण तापले. अमिरने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

----