शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझील स्वीट ऑरेंजची पाच ‘व्हेरायटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:30 IST

‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देजैन इरिगेशन सिस्टीमच्या स्टॉलमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. याची माहिती घेण्यासाठी कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अशोक अग्रवाल यांनी सांगितले, जैन स्वीट ऑरेंजच्या पाच जाती उपलब्ध आहेत. या नवीन जाती जास्त उत्पन्न देणाऱ्या लवकर व उशिरा काढणीस योग्य अशा आहेत. जमीन व पाण्याची सुपीकता व प्रत यानुसार या नवीन जातीपांसून शेतकरी सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादने घेऊ शकतात, असेही ते म्हणाले. ‘स्टॉल’वरून मोसंबी लागवडीसाठी जमिनीची माहिती, लागवडीसाठी हवामान, जातीची माहिती, अभिवृद्धी व लागवड कशी करावी याची माहिती दिली जात आहे.पारंपरिक व आधुनिक लागवडीची तुलनाजैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना पारंपारिक व आधुनिक जैन स्वीट ऑरेंजची तुलनाची माहितीही दिली जात आहे. यात पारंपरिक पद्धतीत मोसंबी लागवड ही गादी वाफ्यावर जमिनीत केली जाते तर आधुनिक लागवडीमध्ये माती विरहित कपात ग्रीनहाऊसमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये खुंटापासून रोगांचा प्रसार होतो तर आधुनिक पद्धतीत खुंटापासून रोगाच्या प्रसाराला आळा बसतो. अशा अनेकबाबतीत तुलनात्मक माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे.ठिंबकमधून ५० टक्के पाण्याची बचतअग्रवाल म्हणाले, ठिंबक सिंचनामधून ५० टक्के पाण्याची बचत होते. कारण पाणी हे जमिनीस न देता पिकांना दिले जाते. मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. वाफसा स्थिती कायम राहत असल्यामुळे पिकाची सतत व जोमदार वाढ होते. पिकास पाणी दररोज अथवा गरजेप्रमाणे एक दिवसाआड देता येते. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. परिणामी, उत्पादनात वाढ, फळे दर्जेदार व एकसारखी येतात.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर