दागिने लंपास
नागपूर : कपिलनगरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरून ५ लाख, ८५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
कामठी मार्गावरील सायोना पब्लिक स्कूलजवळच्या बी. एच. टॉवरमध्ये राहणाऱ्या मनदीपकौर कुलजीतसिंग वाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान त्यांच्या घरातील लॉकरमध्ये ठेवलेले पाच लाख, ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्याची तक्रार वाडे यांनी गुरुवारी कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---
कारमधून रोकड लंपास
नागपूर : गुरुद्वारामध्ये दर्शनाला गेलेल्या एका व्यक्तीच्या कारमध्ये ठेवलेली रोकड चोरट्यांनी चोरून नेली. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. पाचपावलीतील व्यावसायिक हरजीतसिंग बलविंदरसिंग सग्गू हे गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास बुद्धनगरातील गुरुद्वारात दर्शनाला गेले. त्यांनी आपली इनोवा कार गुरुद्वाराच्या बाजूला ठेवली होती. दुपारी १२ वाजता परत आले तेव्हा त्यांना कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यात ७८ हजार रुपयांची रोकड होती, ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. सग्गू यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
---