शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

मेंदूच्या आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक

By admin | Updated: December 21, 2015 03:21 IST

नियमित शारीरिक व्यायामामुळे मेंदूच्या रचनेत व कार्यावर निश्चितच सकारात्मक फायदे दिसून येतात,

चंद्रशेखर मेश्राम : इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीची पदयात्रानागपूर : नियमित शारीरिक व्यायामामुळे मेंदूच्या रचनेत व कार्यावर निश्चितच सकारात्मक फायदे दिसून येतात, असा निष्कर्ष नव्या संशोधनांती काढण्यात आल्याची माहिती वरिष्ठ मज्जारोग तज्ज्ञ व इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरोलॉजीच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय मेंदू सप्ताह’ाच्या निमित्ताने आयोजित पदयात्रेनंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. पदयात्रेला हिरवी झेंडी आमदार डॉ. मिलिंद माने यांदी दाखविली. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धेने, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुधीर भावे, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. राजू खंडेलवाल आदी उपस्थित होते. पदयात्रा, टिळक पत्रकार भवन येथून निघाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक होऊन पुन्हा टिळक पत्रकार भवनात आली. यावेळी मोठ्या संख्येत वैद्यकीय विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीचा समारोप तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानंतर करण्यात आला. यावेळी डॉ. मेश्राम म्हणाले, रोज व्यायाम करण्याने न करणाऱ्यांच्या तुलनेत स्मृतिभ्रंश ‘डिमेन्शिया’ विकार जडण्याची शक्यता ३० टक्के कमी होते. ५५ वर्षांचे वय झाल्यावर एक ते दोन टक्के मेंदू लोप पावतो. व्यायामाने बुद्धी तरतरीत राहते. अभ्यास लक्षात राहतो व शिकण्याची प्रक्रियाही दृढ होते. मेंदू कार्यशील राहतो. मज्जारज्जू सुरक्षित राहण्यास मदत होते. शारीरिक हालचाल व परिश्रमामुळे अल्झायमर व कंपवात विकृती होण्याचा संभाव्य धोका कमी होतो, असेही ते म्हणाले. व्यायामाने चित्त प्रसन्न राहते. कामात मन लागते. सकारात्मकता येते, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांंनी व्यक्त केले. डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, व्यायामाने मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयाघात याचे प्रमाण घटते. मेंदूवर अल्प रक्त संचाराने होण्याचा दुष्परिणामाचा धोकाही कमी होतो. पूर्वी असा समज होता की, केवळ बाल्यावस्थेतच मेंदूची वाढ होते. पण हल्लीच्या संशोधनात तो चुकीचा असून प्रौढ वयांत सुद्धा तो सक्रिय व वाढत असतो. (प्रतिनिधी)