शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोराच्या बांधल्या मुसक्या

By admin | Updated: July 24, 2014 01:07 IST

विणकराचे ओळखपत्र देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने अटक केली.

आठ हजार स्वीकारले : विणकर सेवा केंद्राचा उपसंचालक फसलानागपूर : विणकराचे ओळखपत्र देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणाऱ्या विणकर सेवा केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने अटक केली. एच. बी. सूर्यवंशी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते विणकर सेवा केंद्रात उपसंचालक आहेत. ताजनगर मानेवाडा येथील रहिवासी मोहम्मद कादीर शेख तय्यब हे आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून विणकाम (विणकर) करतात. त्यांचा सतरंजीचा कारखानाही आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विणकरांचे अधिकृत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे ओळखपत्र उपसंचालक, विणकर सेवा केंद्रातून मिळते. त्यामुळे मोहम्मद कादीर शेख तय्यब तसेच त्यांचे काका शेख चांद ताजी यांनी उपसंचालक कार्यालयात विणकराचे ओळखपत्र मिळावे म्हणून रीतसर अर्ज केला होता. बरेच दिवसांपासून झुलवाझुलव सुरू असल्यामुळे शेवटी मोहम्मद कादीर यांनी उपसंचालक सूर्यवंशी यांची भेट घेतली. सूर्यवंशींनी कादीर तसेच त्यांचे काका शेख चांद यांना ओळखपत्र देण्यासाठी प्रत्येकी चार हजार (एकूण आठ हजार रुपये) लाच द्यावी लागेल, असे सांगितले. साध्या ओळखपत्रासाठी आठ हजारांची मागणी अवास्तव वाटल्यामुळे कादीर यांनी आपल्या ओळखींच्यांकडे तक्रार केली. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून सीबीआयचे अधीक्षक संदीप एम. तामगाडगे यांच्याकडे लाचखोर सूर्यवंशीची २२ जुलैला तक्रार करण्यात आली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर अधीक्षक तामगाडगे यांनी आज कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार आज दुपारी सीबीआयचे निरीक्षक नीरज गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईचा सापळा लावला. ठरल्याप्रमाणे कादीर लाचेची रक्कम घेऊन सूर्यवंशी यांच्याकडे गेले. सूर्यवंशींनी लाचेची रक्कम स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने त्यांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने कार्यालयाचीही झडती घेतली. ओळखपत्रासाठी अडवणूक नागपुरात टेक्सटाईल्स पार्क सुरू होणार असल्याच्या घोषणेने विणकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण टेक्सटाईल्स पार्कचा थेट फायदा विणकरांना मिळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे ओळखपत्र असावे म्हणून प्रत्येक विणकर धडपडतो आहे. त्याचा गैरफायदा उठवून ओळखपत्रासाठी विणकरांची अडवणूक केली जात आहे. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात आहे, आजच्या कारवाईतून ते अधोरेखित झाले आहे.