शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ब्रह्मोस हेरगिरी प्रकरण: आयएसआय हेर अखेर लखनौला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:10 IST

विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली.

ठळक मुद्देहवाई प्रवासाची परवानगी मिळण्यास विलंब

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमान प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे हेरगिरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या निशांत अग्रवालला लखनौला नेण्यासाठी तब्बल एक दिवस उशीर झाला. अखेर बुधवारी परवानगी मिळाली. त्यामुळे २४ तास विलंबाने, बुधवारी सायंकाळच्या विमानाने निशांतला लखनौला नेण्यात आले.सोमवारी भल्या सकाळी मिलिटरी इंटेलिजन्स आणि उतर प्रदेश एटीएसच्या पथकाने निशांत अग्रवालला अटक केली. त्याची दिवस-रात्र कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. एटीएसच्या पथकाने त्याचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मागितला. त्यामागची पार्श्वभूमीदेखील एटीएसच्या तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली. प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. तो शत्रूराष्ट्रासाठी हेरगिरी करीत असल्याचा संशय असल्याने निशांतला विमानाने न्यायचे, रेल्वेने की रस्त्याने (वाहनाने) न्यायचे ते ठरले नाही. सुरक्षेची पुरती खबरदारी घेण्यात वेळ जाऊ शकतो,असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड न्यायालयाने मंजूर केला. त्यानंतर निशांतला स्पेशल कस्टडीत ठेवण्यात आले.वाहनाने नेल्यास त्याचे अपहरण करण्याचा, हल्ला होण्याचा किंवा अन्य दुसरा धोका होऊ शकतो. दीर्घ पल्ल्याचे अंतर असल्याने पोहोचण्यासही उशीर होऊ शकतो. रेल्वेने नेल्यास बाथरूमच्या वेळी वगैरे तो उडी घेऊ शकतो. त्यामुळे त्याला विमानाने लखनौला नेण्याचे ठरविण्यात आले. मात्र, अशा प्रकरणातील आरोपीला हवाईमार्गे नेण्यासाठी विमान प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. ती ताबडतोब मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी त्याला नागपुरातून लखनौला विमानाने नेणे शक्य झाले नाही. त्यानंतर आज सकाळपासून सुरक्षा यंत्रणांनी निशांत अग्रवाल तसेच तपास पथकातील अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारपर्यंत आवश्यक ती सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली. ‘हाय सिक्युरिटी अ‍ॅन्ड व्हेरी स्पेशल केस’ म्हणून तातडीने विमान प्रवासाची परवानगी मिळावी, असे प्रयत्न झाले. दरम्यान, मंगळवार ते बुधवार सायंकाळपर्यंतचे २४ तास नागपूर, मुंबई आणि दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा आणि विमान प्राधिकरणाचे अधिकारी निरंतर एकमेकांच्या संपर्कात होते.त्याला यश आले. विमानतळ प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली. त्यानुसार, सायंकाळी ५.३० वाजता त्याला तपास अधिकारी नागपूरच्या विमानतळावर घेऊन पोहचले. एटीएस तसेच विमानतळावरील सुरक्षा पथकाच्या गराड्यात त्याला विमानात बसविण्यात आले आणि दिल्लीमार्गे लखनौला नेण्यात आले.

डील या नो डील ?निशांतला ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सच्या पॅकेजचे आमिष दाखवून फितुरी करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, कोणतीही रक्कम त्याच्या नागपुरातील बँक खात्यात जमा झाल्याचे जाणवत नसल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. तपास अधिकाऱ्यांनी निशाांत आणि त्याच्याशी संबंधित सर्वांचे बँक खाते आणि त्यातील व्यवहार तपासले. त्यातून बँक खात्यात पगाराव्यतिरिक्त कोणतीही मोठी रक्कम अथवा दुसरा व्यवहार झाला नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी लोकमतला दिली आहे. त्यामुळे नागपुरातून ब्रह्मोसची हेरगिरी करणाऱ्या निशांतचे प्रत्यक्षात नागपुरात डील झाले की नाही, ते उघड झालेले नाही.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोस