शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

बोर्इंगचा एमआरओ पूर्णत्वाच्या मार्गावर

By admin | Updated: February 11, 2015 02:26 IST

विमानांची देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा असलेला बोर्इंग इंकचा मिहानमधील प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, यावर्षीच्या मे महिन्यात कार्यान्वित होणार ....

नागपूर : विमानांची देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा असलेला बोर्इंग इंकचा मिहानमधील प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, यावर्षीच्या मे महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमानाची देखभाल व दुरुस्तीसाठी कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाची सामग्री आणि उपकरणे उभारली आहेत. या सुविधांची पाहणी नागरी उड्डयण महासंचालनालयाच्या तज्ज्ञ चमूतर्फे केल्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित होईल. नागपूर विमानतळ ते एमआरओपर्यंत एमएडीसीतर्फे उभारण्यात येणाऱ्या २.५ कि़मी.च्या टॅक्सी वेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच एमआरओ कार्यान्वित होईल, असे सूत्रांनी सांगितले. एमआरओची वैशिष्ट्येबोर्इंग एमआरओ हा मिहान-सेझमध्ये जवळपास ५० एकर जागेवर उभा आहे. प्रकल्पाचा समोरील भाग मिहान-सेझसाठी खुला तर मागील भागाकडून दुसरी धावपट्टी उभारण्यात येणार आहे. बोर्इंगने प्रशासकीय इमारत, कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर, रेस्ट रूम, अल्पोपहारगृह आणि अन्य सुविधा एमआरओ कॉम्प्लेक्सच्या १० एकर जागेत आहेत. उर्वरित जागेत बोर्इंगने ४०० बाय ४०० मीटरचे मोठे हँगर बांधले आहे. सहा मजली इमारतीएवढी या हँगरची उंची आहे. या हँगरमध्ये तीन नियमित आकाराचे (दोन इंजिनचे विमान) विमान अथवा एक मोठ्या आकाराचे विमान (चार इंजिनचे विमान) एकाच वेळी सामावू शकतील. यातील अद्ययावत उपकरणे आणि सामग्रीच्या सहाय्याने विमानाची जोडणी, दुरुस्ती, सर्व्हिसिंग, पेंटिंग आदी कामे करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर, प्रवासी व मालवाहू विमान, एक्झिक्युटिव्ह जेट आणि लढाऊ विमानांची दुरुस्ती होईल. बोर्इंग एमआरओ सुविधा आयएएफ मेन्टेनन्स बेससाठी बंधनकारक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोर्इंग एमआरओ हा बोर्इंग आणि एअर इंडियाचा संयुक्त उपक्रम असून संचालन एअर इंडिया करणार आहे. जवळपास ३०० एव्हिएशन अभियंते आणि ६०० सहायक कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. अभियंत्यांना बोर्इंग आपल्या सिटल फॅक्टरी किंवा शांघाय एमआरओ येथे प्रशिक्षण देणार आहे.