शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचे जामीन अर्ज फेटाळले

By admin | Updated: February 24, 2017 03:04 IST

नकली मालकीण दाखवून आणि बनावट दस्तावेज तयार करून हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या एका वृद्धेची

नकली मालकीण दाखवून वृद्धेच्या जमिनीची विक्रीनागपूर : नकली मालकीण दाखवून आणि बनावट दस्तावेज तयार करून हैदराबाद येथे वास्तव्यास असलेल्या एका वृद्धेची पारशिवनी भागातील जमीन विकण्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींचे जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले. सच्चिदानंद दूधनाथ तिवारी आणि चंद्रशेखर राजाराम भारद्वाज, अशी आरोपींची नावे आहे. त्यापैकी तिवारी हा या बनवाबनवीच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. प्रकरण असे की, शालिनी सुरेशसिंग तोमर यांची पारशिवनी भागात सर्वे क्रमांक ६३/२ मध्ये ४ हेक्टर जमीन आहे. तिवारी आणि साथीदारांनी या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून ते फिर्यादी महादेव कांबळे यांना दाखवले आणि ही जमीन विकण्याचा सौदा केला होता. कांबळे यानी तिवारीला ५१ हजार रुपये बयाना रक्कम म्हणून देण्याचे कबूल केले होते. या जमिनीची मालकीण पारशिवनी येथे आपल्या भावाकडे येणार असून तेथेच सौदाचिठ्ठी आणि करार करण्याचे ठरले होते. १६ डिसेंबर २०१६ रोजी महादेव कांबळे हे ५१ हजार रुपये देण्यासाठी पारशिवनी येथे गेले होते. फिर्यादीचे साक्षीदार म्हणून तेथे त्यांचा मित्र कुलदीप सराटे हजर होता. पारशिवनी तहसील कार्यालयाच्या समोरील कँटिनमध्ये जमिनीचे मालक म्हणून तिवारी आणि अन्य तीन जण हजर होते. ३ लाख ५० हजारात ही जमीन विकण्याचे ठरले. ५१ हजार रुपये बयाना रक्कम म्हणून कांबळे यांनी तिवारी याला दिले होते. त्यांना मालकिणीचे निवडणूक ओळखपत्र दाखवून छायांकित प्रत देण्यात आली. करारपत्रावर विक्रीदार म्हणून तिवारी आणि खरेदीदार म्हणून तिवारी यांनी स्वाक्षरी केली होती. काही दिवसानंतर कांबळे यांचा मित्र सराटे याने तिवारीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो भेटण्यास सतत टाळाटाळ करीत होता. संशय निर्माण झाल्याने कांबळे यांनी मूळ जमीन मालकिणीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता त्या मनसर येथील मूळ रहिवासी असल्याचे आणि सध्या त्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांना समजले होते. निवडणूक ओळखपत्रही बनावट होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. त्यांनी जामीन अर्ज दाखल केले असता न्यायालयाने ते फेटाळून लावले. (प्रतिनिधी)