शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा

By admin | Updated: July 8, 2016 02:57 IST

प्रेमप्रकरणाची वाच्यता केल्याचा संशय घेऊन एका १७ वर्षीय तरुणीला ठार मारण्याच्या हेतूने मेहंदीबाग उड्डाण पुलावरून ...

उड्डाण पुलावरून तरुणीस फेकल्याचे प्रकरण : मेहंदीबागेतील घटनानागपूर : प्रेमप्रकरणाची वाच्यता केल्याचा संशय घेऊन एका १७ वर्षीय तरुणीला ठार मारण्याच्या हेतूने मेहंदीबाग उड्डाण पुलावरून फेकणाऱ्या दोन जणांना गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी रोशन ऊर्फ हरिहर तुकाराम कुहीकर (२३) रा. तांडापेठ चंद्रभागानगर आणि लखन केशव पौनीकर (२४) रा. खरबी रिंगरोड, वाठोडा ले-आऊट,अशी आरोपींची नावे आहेत. पिंकी सुंदर लिल्लारे,असे जखमी तरुणीचे नाव असून घटनेच्या वेळी ती कांजी हाऊस चौक येथील रहिवासी होती. या प्रकरणात आणखी एक विधिसंघर्षग्रस्त बालिका असून, तिच्यावर बालन्यायालयात खटला चालणार आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, हे दोन्ही आरोपी, पिंकी आणि १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालिका एकाच दुकानात नोकरी करीत होते. त्यापैकी आरोपी रोशनचे विधिसंघर्षग्रस्त बालिकेसोबत प्रेमसंबंध होते. पिंकीने या प्रेमप्रकरणाची दुकानातील लोकांकडे आणि आजूबाजूच्या लोकांजवळ वाच्यता केल्याचा आरोपींना संशय होता. काही दिवसानंतर खुद्द पिंकीनेच विधिसंघर्षग्रस्त बालिकेचा विवाह रोशनऐवजी लखन याच्यासोबत करून दिला होता. या प्रकाराने रोशन कुहीकर हा संतप्त झाला होता. पुढे या तिघांनीही पिंकीला कायमचे संपविण्याचे ठरवले होते. घटनेच्या दिवशी २६ जुलै २०१३ रोजी पिंकी ही कामावरून घरी परतत असताना रोशन आणि विधिसंघर्षग्रस्त बालिकेने तिला रस्त्यात गाठले होते आणि एकांतात बोलायचे आहे, असे म्हटले होते. त्यामुळे पिंकी ही रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घरून चकणा चौक येथे रोशनला भेटण्यासाठी आली होती. रोशन आणि विधिसंघर्षग्रस्त बालिकेने पिंकीला मोटरसायकलवर बसवून ‘गुपचूप’ खाण्याच्या बहाण्याने प्रेमनगर पुलाकडून इतवारीकडे नेले होते. गुपचूप खाऊन झाल्यानंतर या दोघांनी तिला घरी पोहोचवून देतो, असे म्हटले होते. ते तिला दहीबाजारमार्गे मेहंदीबाग पुलाकडे घेऊन गेले होते. (प्रतिनिधी)