शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 03:03 IST

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला.

वाहनाच्या वेगाने घेतला जीव : तेलंखेडी व हिंगणा रोडवर अपघात नागपूर : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला. दुचाकी वाहनाच्या भरधाव वेगाने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. पहिली घटना तेलंखेडी येथे घडली. अनिकेत हिरणवार (२१) रा. गवळीपुरा धरमपेठ हा बुधवारी सकाळी ७.२५ वाजता तेलंखेडी येथील त्याचा मित्र कार्तिक रणावरे याच्यासोबत बाईकने जात होता. बाईक भरधाव वेगात असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठासमोर एका ट्रकने बाईकला धडक दिली. यात अनिकेत आणि कार्तिक गंभीर जखमी झाले. अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक तेथून पळून गेला. काही वेळातच स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे वृत्त पसरले. अंबाझरी पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. अंबाझरी ठाण्याचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी मात्र हा अपघात स्टंट दाखवण्याच्या प्रयत्नातून झाला नसल्याचे स्पष्ट केले. अनिकेत बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. तर कार्तिक बीसीसीए प्रथम वर्षाला शिकतो. घटनेच्यावेळी त्याच्यासोबत हितेश ढुमणे हा सुद्धा होता. तो दुसऱ्या बाईकवर होता. विचारपूस केली असता हितेशने नुडल्स खाण्यासाठी फुटाळा चौपाटी येथे गेल्याचे सांगितले. फुटाळा चौपाटीवर सकाळच्या वेळी बाईकस्वार स्टंटबाजी करताना आढळून येतात. त्यांच्यामुळे रस्त्यांना ये-जा करणारे आपला जीव मुठीत धरून चालत असतात. त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी सुद्धा केली जात आहे. दुसरा अपघात दुपारी १२ वाजता हिंगणा रेडवर सुतगिरणीजवळ घडला. विजय द्वारकाप्रसाद तिवारी (४७) रा. बाजीप्रभू चौक, रामनगर असे मृताचे नाव आहे. तिवारी प्रॉपर्टी डीलर होते. ते दुचाकीने दुपारी १२ वाजता हिंगण्यावरून परत येत होते. त्यांच्यासमोर मधुसुदन दरक हे दुचाकीने जात होते. तिवारी यांनी दरक यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून समोर निघण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात दरक यांच्या दुचाकीचा तिवारी यांच्या बाईकला कट लागला. दोघेही वाहनासह खाली पडले. त्याचवेळी तिवारी हे मागून आलेल्या एम.एच./४०/ए.के. ७९९१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये सापडले. यात दोघेही जखमी झाले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिवारी यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)