नागपूर : अंबाझरी व वाडी परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. पहिली घटना बुधवार ५ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता घडली. हजारीपहाड, गिट्टीखदान रहिवासी राजू गदमसिंह थापा (३८) रात्री दुचाकीने घरी जात होता. अमरावती रोडवरील फुटाळा बीअर शॉपीच्या समोर एका अज्ञात वाहन चालकाने धडक देऊन पळून गेला. जखमी राजूला उपचारासाठी मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी दुपारी १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना ६ आॅक्टोबर गुरुवार सकाळी ६.४५ वाजता घडली. डिगडोह, हिंगणा रोड रहिवासी प्रदीप श्रीधर गडलिंग (४९) आपल्या दुचाकीने हिंगणा रोड स्थित एस.टी. वर्क शॉपकडून डिफेन्सच्या चेक पॉर्इंटकडून जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. प्रदीपला जखमी अवस्थेत खासगी इस्पितळात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
अपघातात दोघांचा मृत्यू
By admin | Updated: October 10, 2016 02:18 IST