नागपूर : भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शनिवारी सकाळी ७.३० वाजता सावित्री श्रीधरन नायर (६३) रा. लक्ष्मी रॉयल, राठोड ले आऊट, अनंतनगर, गिट्टीखदान या स्कुटी पेप गाडी क्रमांक एम. एच. ३१, डी. आर. ८१३९ ने अयप्पा मंदिरकडे जात होत्या. जाफर नगर रिंग रोडवर अयप्पा मंदिर गेट समोर मागून येणाऱ्या ओम्नी गाडी क्र. एम. एच. ४९, जे ०३७६ च्या चालकाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी संतोष श्रीधरन नायर (३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत शुक्रवारी रात्री ११ वाजता ट्रक क्रमांक एम. एच. ३१, सी. बी. ७७०२ चा चालक गजानन तुळशीराम सरकटे (४७) रा. कपिलनगर, संन्यासनगर हे अपला ट्रक कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंडारा रोड, कापसी उड्डाणपुल तिरुपती बारजवळ उभा करून लघुशंकेसाठी खाली उतरत होते. तेवढ्यात मागून येणाऱ्या अज्ञात पिवळ्या रंगाच्या टिप्परने त्यांना धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
अपघातात दोघे जागीच ठार
By admin | Updated: April 5, 2015 02:25 IST