शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

सीमातार्इंचा सामाजिक वारसा हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:58 IST

स्वभावाने अत्यंत मायाळु, गरिबांविषयी कणव, प्रचंड हुशार, वक्तृत्वातही सुंदर, असे एक ना अनेक स्वभावगुण अ‍ॅड. सुहासिनी साखरे यांच्यात होते.

ठळक मुद्देगोरगरिबांविषयी होती विशेष आस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वभावाने अत्यंत मायाळु, गरिबांविषयी कणव, प्रचंड हुशार, वक्तृत्वातही सुंदर, असे एक ना अनेक स्वभावगुण अ‍ॅड. सुहासिनी साखरे यांच्यात होते. त्यांच्या निधनाने आईची काळजी घेणारी एक आदर्श मुलगी अन् सीमाताई साखरेंचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.सुहासिनी साखरे यांनी लॉ कॉलेजमधून सुवर्णपदक घेऊन एलएलबीची पदवी पूर्ण केली. त्यानंतर लंडनच्या केंब्रिज विद्यापीठातूनही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून एलएलएमच्या पदवीत सुवर्णपदक मिळविले. सात वर्षांपूर्वी त्या नागपुरात परतल्या. नागपुरात त्यात इंटरनॅशनल लॉयर्स असोसिएशनमध्ये काम करीत होत्या. १६ आॅक्टोबरला याच असोसिएशनतर्फे जॉब करण्यासाठी त्या सॅनफ्रान्सिस्कोला जाणार होत्या. अ‍ॅड. सुहासिनी या स्वभावाने अतिशय प्रेमळ होत्या. समाजातील गोरगरिबांविषयी त्यांना विशेष आस्था होती. कुशाग्र बुद्धीसोबतच त्या वकृत्व कलेतही पारंगत होत्या. केवळ वकिली व्यवसायातच नव्हे तर साहित्य क्षेत्राचीही त्यांना आवड होती. त्यांचे इंग्रजी कवितांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. आपली आई सीमाताई साखरे यांची त्या अतिशय काळजी घेत होत्या. सीमाताईंना औषध देण्यापासून त्यांनी जेवण केले की नाही, यावर नेहमीच त्या लक्ष ठेवून असत. त्यांच्या निधनामुळे सीमाताईंची काळजी घेणारी एक आदर्श मुलगी हरविली आहे. सीमाताईंच्या स्त्री अत्याचार विरोधी परिषदेतही त्या सक्रिय होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांचा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला भाऊ समीर तातडीने नागपूरला निघाला आहे. अ‍ॅड. सुहासिनीच्या अकाली जाण्यामुळे सीमाताई साखरेंचा सामाजिक वारसा काळाच्या पडद्याआड हरविला आहे.