शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

पुस्तके भिजली, पण जिद्द कायम

By admin | Updated: June 18, 2014 01:29 IST

गेल्यावर्षी मुसळधार पाऊस झाला. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. अवस्थीनगरात राहणारे आॅटो चालक मजीद खान यांच्याही घरात पाणी शिरले. त्यांची मुलगी नुकतीच दहावीला गेली होती.

आॅटोचालक वडिलांना दिली ‘मसरत’आनंद डेकाटे - नागपूरगेल्यावर्षी मुसळधार पाऊस झाला. शहरातील जवळपास सर्वच वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. अवस्थीनगरात राहणारे आॅटो चालक मजीद खान यांच्याही घरात पाणी शिरले. त्यांची मुलगी नुकतीच दहावीला गेली होती. पाण्यात तिची संपूर्ण पुस्तके भिजून गेली. आधीच घरची परिस्थिती बेताची. अशा अवस्थेत जुळवाजुळव करून आणलेली पुस्तकेही भिजली. ते पाहून त्या मुलीचे डोळेही पाणावले. परंतु ती खचली नाही. पाऊस ओसरला. भिजलेली पुस्तके उन्हात वाळवली. जोमाने अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१.२० टक्के गुण घेऊन शाळेत पहिला नंबर पटकावला. मसरत मजीद खान असे या गुणवंत मुलीचे नाव आहे. मसरतचा अर्थ होतो खुशी़ आज तिच्या या घवघवीत यशाने मजीद खान यांना खरच मोठी खुशी मिळाली आहे़ मसरत ही सदर मंगळवारी बाजार येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आहे. मसरतचे वडील मजीद हे आॅटो चालक आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. पोलीस लाईन टाकळी परिसरातील अवस्थीनगर येथे ते आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या खोलीत राहतात. आॅटोसुद्धा ते भाड्यानेच चालवितात. घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. परंतु त्यांनी आपल्या तिन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. यातच मसरतने ९० टक्के गुण घेऊन वडिलांचाही मान वाढविला आहे. मसरतला विज्ञान शाखेत जायचे आहे. १२ वी नंतर एमबीबीएस होण्याचे तिचे स्वप्न आहे. तसे तिने वडिलांनाही सांगितले आहे. मसरतच्या या यशामुळे अवस्थीनगरात आनंद पसरला आहे.