शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बसपाच्या हत्तीने फोडला घाम

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण

मताधिक्यात वाढ : विजयाचे समीकरण बदलण्यात यश आनंद डेकाटे - नागपूर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजन समाज पार्टीने स्वबळावर लढत आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. गेल्या काही निवडणुकीमध्ये बसपाचा हत्ती जोरात चालला असून विजयाचे समीकरण बदलण्यात बसपाला यश आले आहे. या निवडणुकीतही बसपाचा हत्ती जोरात चालला. विदर्भातील ६१ उमेदवारांनी तब्बल ६ लाख ८७ हजार ७८३ मते घेतली. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. उर्वरित उमेदवारांनीही समाधानकारक मते घेतली. परंतु तरीही बसपाला यंदा आमदारकीचे खाते उघडता आले नाही. बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रात एक सशक्त राजकीय पार्टी असून विजयाचे समीकरण बदलणारा पक्ष अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात बसपाची मुख्य शक्ती ही विदर्भ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून बसपाचा सफाया झाला. देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असलेल्या बसपाच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत बसपा सुप्रीमो मायावती यांना हरियाणा व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांपासून बरीच अपेक्षा होती. यातही महाराष्ट्रावरच अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यानुसार मायावती यांच्या महाराष्ट्रात आठ जाहीर सभा झाल्या. यापैकी नागपूर आणि भंडारा येथे प्रत्येकी एक सभा घेण्यात आली. या सभेचा फायदाही बसपाला झाला. विदर्भात बसपाचे एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये, भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे आणि उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना घाम फोडला. हे तिघेही दुसऱ्या क्रमांकावर राहिले. किशोर गजभिये यांनी तब्बल ५५,१८७ मते घेतली. महाराष्ट्रात बसपाच्या उमेदवारांमध्ये ही सर्वाधिक मते ठरली. त्यानंतर भंडारा येथून देवांगणा गाढवे-वालदे यांनी ४५,००० मते घेतली. उमरेडमधून वृक्षदास बन्सोड यांनी ३४,०७७ मते घेतली. याशिवाय राजेंद्र पडोळे १६,५४०, (दक्षिण-पश्चिम नागपूर), सत्यभामा लोखंडे २३,१५६ (नागपूर-दक्षिण), दिलीप रंगारी १२,१६४(पूर्व नागपूर), अहमद कादर १४,२२३ (पश्चिम नागपूर), सुरेश डोंगरे ११,०९७ (सावनेर), महेंद्र गणवीर, ३१,६४९ (साकोली), अ‍ॅड. राजेश सिंग १०,३४४ (बल्लारपूर), मो. शमी लोखंडवाला ३४,४९८ (यवतमाळ), अभिजित ढेपे २९,२२९ (धामणगाव रेल्वे), हाजी मो. रफीक शेख २०,६०२ (अचलपूर), उमेश म्हैसकर २४,९७३ (देवळी पुलगाव), प्रलय तेलंग २५,१०० (हिंगणघाट), नीरज गुजर २२,२८३ (वर्धा) अशी उमेदवारांनी भरघोस मते घेतली. अनेक उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उर्वरित उमेदवारांनी भरघोस मते घेत विजयाचे समीकरण बदलविले. परंतु बसपाला या निवडणुकीमध्येसुद्धा खाते उघडता आले नाही.