शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा

By admin | Updated: July 21, 2016 01:58 IST

मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुढील भागात पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली...

बीडीडीएस’कडून तपासणी : तीन तास पोते बेवारस नागपूर : मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुढील भागात पांढऱ्या रंगाच्या पोत्यात बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केल्यानंतर सर्वांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पुढच्या महिन्यात स्वातंत्र्यदिन आहे. अशास्थितीत लोहमार्ग पोलीस, आरपीएफने सतर्क राहणे गरजेचे आहे. परंतु बेवारस पोते पडून असल्याची बाब मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी लक्षात आणून देऊनही लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने त्याकडे दुर्लक्ष केले. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात दुपारी ३ वाजेपासून एक पांढऱ्या रंगाचे पोते बेवारस स्थितीत पडून होते. याच भागात कुली बसलेले असतात. बेवारस पोते दिसल्यानंतर त्यांनी बराच वेळ वाट बघितली. परंतु त्यावर कोणीच हक्क न सांगितल्यामुळे त्यांना संशय आला. अब्दुल मजीद यांनी सुरुवातीला मेनगेटवर ड्युटीला असलेल्या एका आरपीएफ जवानास ही बाब सांगितली. परंतु त्याने लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीवर सूचना दिली असता त्यांनी आरपीएफकडे बोट दाखविले. अखेर बॉम्ब शोधक व नाशक पथक तेथे उपस्थित असल्यामुळे त्यांना सूचना दिल्यानंतर या पोत्याची श्वान पथकाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. परंतु पोत्यात काहीच न आढळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोत्यात काहीच नसल्याचे समजताच पोते उघडे करून पाहिले असता त्यात मिठाईचे रिकामे बॉक्स आढळले. यावेळी बीडीडीएस पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक धम्मदीप इंगळे, पोलीस हवालदार मनोज गुप्ता, धीरज पाली, ऋषी राखुंडे, राहुल सेलोटे आणि श्वान रॉनी यांनी तपासणी केली.(प्रतिनिधी)