शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

परमबीर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 10:22 IST

Nagpur News सर्वत्र चर्चेला आलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आता एक बॉम्ब पडण्याची शक्यता चर्चेला आली आहे.

ठळक मुद्दे६० हजार कोटींचा घोटाळा नव्याने येणार चर्चेलात्यावेळेच्या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंशी जवळीक भोवल्याने मुंबई सीपी पदावरून उचलबांगडी झालेले आणि नंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब टाकल्याने सर्वत्र चर्चेला आलेले आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर आता एक बॉम्ब पडण्याची शक्यता चर्चेला आली आहे.

हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा हा बॉम्ब असून, संबंधित अधिकाऱ्याकडूनच तो परमबीर सिंगांवर टाकला जाणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, प्रकरण १९९९ चे आहे. ठाणे-मुंबई परिसरात एका टोळीकडून पोस्टाची बनावट तिकिटे विकली जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला मिळाली होती. या दिलेर अधिकाऱ्याने त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून तब्बल १५ दिवस वेशांतर करून या टोळीची पुराव्यासहित माहिती मिळविली. त्यानंतर २१ ऑगस्ट १९९९ ला या अधिकाऱ्याने मीरारोड पोलीस चौकीतील एक अधिकारी आणि सहकाऱ्यांसह छापा घालून फुलचंद जैन नामक आरोपीला पकडले. त्याच्याकडून २१ हजारांची बनावट पोस्टाची तिकिटे, महसूल तिकिटे (रेव्हेन्यू स्टॅम्प) आणि रोखे हस्तांतरणासाठी वापरली जाणारी तिकिटे जप्त केली. तेलगी घोटाळ्याचा तो पहिला एफआयआर मीरारोड पोलीस चौकीत (सीआर नंबर २७४/ १९९९) नोंदवला गेला होता. त्यानंतर पुढच्या चार दिवसात अनुक्रमे उमेश खंडेलवाल (जव्हेरी बाजार) आणि भाऊसाहेब जगदाळे (जीपीओ, व्हीटी, मुंबई)ला पकडले. जगदाळे हा पोस्टाचा कर्मचारी होता अन् त्याच्याकडे तिकीट विक्रीचे काऊंटर होते.

तो तेलगीनिर्मित अर्धी बनावट तिकिटे विकायचा अन् अर्धी तिकिटे पोस्टाची विकायचा. बनावट तिकिटांच्या विक्रीची रक्कम नंतर या रॅकेटमधील आरोपी वाटून घ्यायचे. जगदाळेने पुन्हा काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरून विजय कदम याला शिवडीत अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तिकिटांना पाडल्या जाणाऱ्या छिद्राची (ज्यातून तिकीट फाडून वेगळे केले जाते) मशीन आणि मोठ्या प्रमाणात बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. यानंतर उदय सावंत हा बडा मासा पकडून याच अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्ट १९९९ ला कुलाब्यातील मिंट रोडवर असलेल्या अक्षर मुद्रणालय येथे छापा घातला. तेथे सुमारे ९८ लाखांची बनावट तिकिटे, मुद्रांक पोलिसांना सापडले. त्यामुळे अक्षर मुद्रणालयाला सील लावण्याचा निर्णय ही कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला अन् नंतर प्रचंड संशयास्पद घडामोडी घडल्या.

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सील लावण्याची गरज नाही, तुम्ही निघून या, असे म्हटले. अधिकाऱ्यांच्या मते, त्यावेळी ठाणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून परमबीर सिंग होते आणि त्यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून पाटील ओळखले जात होते. पुढे या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आणि ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. हा सर्व खटाटोप तेलगी आणि साथीदारांना वाचविण्यासाठीच झाला होता अन् तो परमबीर सिंगांच्या इशाऱ्यावरूनच झाला होता, असाही या अधिकाऱ्याचा दावा आहे.

आता त्याला तब्बल २१ वर्षे झाली अन् परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यातून पोलिसांतील भिन्न्न मतप्रवाहही पुढे आले आणि तेलगी घोटाळ्याचा छडा लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही भावना तीव्र झाल्या. या पार्श्वभूमीवर, जुने सर्व रेकॉर्ड काढून संबंधित अधिकारी सुमारे ६० हजार कोटींच्या घोटाळ्यातील तेलगी बॉम्ब जिवंत करण्याच्या तयारीला लागले आहेत.

दोन-तीन दिवसांत फुटणार बॉम्ब

याच अधिकाऱ्यांपैकी एकाने लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली असून परमबीर सिंगांमुळे देशाला ६० हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. हा बॉम्ब दोन-तीन दिवसांतच फुटण्याची शक्यता त्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर वर्तविली आहे.

 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंग