शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

नागपूर विमानतळावर बॉम्ब!

By admin | Updated: September 30, 2016 03:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मॉक ड्रीलनंतर बॉम्ब निकामी : विमानतळाच्या सुरक्षेवर शिक्कामोर्तबनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी दुपारी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्ताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पण हे वृत्त खोटे असून विमानतळावर मॉक ड्रील सुरू असल्याचे कळताच प्रवाशांनी नि:श्वास सोडला. अखेर बॉम्बशोधक पथकाने बॉम्बचा शोध घेऊन निकामी करण्याठी अन्य ठिकाणी नेला व विमानतळ सुरक्षित असल्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. प्राप्त माहितीनुसार, दुपारी १.३६ वाजता विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत एक फोन आला. विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या घटनेची माहिती तात्काळ विमानतळाचे संचालन करणारी कंपनी मिहान इंडिया लिमिटेड व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाला देण्यात आली. बॉम्बशोधक पथक (बीडीडीएस) २० मिनिटात तर आयबी, इमिग्रेशन, कस्टम, एटीसी, विमानतळ कार्यान्वयन नियंत्रण केंद्र (एओसीसी), फायर, अ‍ॅम्ब्युलन्स आदींचे सर्व वरिष्ठ अधिकारी २० ते ३० मिनिटात घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधून काढण्यासाठी मानकानुसार गुप्त मोहीम राबविण्याचा तात्काळ निर्णय घेण्यात आला. बॉम्बशोधक पथक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांनी परिसर ताब्यात घेतला आणि प्रवासी व तेथील दुकानदारांना बाहेर काढून त्यांना १०० ते १५० मीटर अंतरावर नेण्यात आले. सीआयएसएफ आणि सोनेगाव पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या मॉक ड्रीलवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक नेमण्यात आला होता. तो विमानतळावर सुरू असलेल्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून होता. तासभर चाललेल्या या घटनाक्रमात बॉम्बशोधक पथकाने बॉम्ब शोधून काढला आणि निकामी करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केंद्र सरकारच्या नागरी उड्डयण संचालनालयाच्या आदेशानुसार मॉक ड्रील घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, वरिष्ठ व्यवस्थापक (आॅपरेशन) लक्ष्मीनारायण, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरटकर, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे उपकमांडंट गुरजीतसिंग आणि वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ही कारवाई भारतीय नागरी उड्डयण संचालनालयाच्या आदेशानुसार आणि ‘सीआयएसएफ’च्या अधिनस्थ करण्यात आली. (प्रतिनिधी)