शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  खंडणी वसूल करताना सापडला बोगस पत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:37 IST

पत्रकार असल्याचे सांगून हॉटेल मॅनेजरकडून खंडणी वसूल करणाऱ्या युवकाला रंगे हाथ पकडण्यात आले. ही घटना सदर पोलीस ठाणे अंतर्गत घडली.

ठळक मुद्देहॉटल मॅनेजरला मागितली खंडणी : सदर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकार असल्याचे सांगून हॉटेल मॅनेजरकडून खंडणी वसूल करणाऱ्या युवकाला रंगे हाथ पकडण्यात आले.ही घटना सदर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. मो. आरीफ खान (३७) सूरजनगर मानकापूर असे आरोपीचे नाव आहे. तो एका वर्तमानपत्राचा पत्रकार असल्याचे सांगतो. तो मंगळवारी रात्री सदर येथील रेसिडेन्सी मार्गावरील हॉटेल चील अ‍ॅण्ड ग्रिलमध्ये आला. त्याने हॉटेलच्या मॅनेजर हेमंत वासवानी याला जाहिरातीचे थकीत पाच हजार रुपये मागितले. रुपये न दिल्यास रेस्टॉरंट बंद करून हॉटेल संचालकाचे जगणे कठीण करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये खळबळ उडाली. हेमंतने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. त्यांनी आरीफला पकडले. दरम्यान सदर पोलीसही घटनास्थळी आले. पोलिसांनी आरीफला ताब्यात घेतले.पोलीस सूत्रानुसार आरीफच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा डॉक्टर, हॉटेल संचालक आणि इतर काही लोकानी खंडणी वसूल केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन तो पैशाची मागणी करीत होता. पोलिसांनी विचारपूस केल्यास नेत्यांचा धाक दाखवून तक्रारकर्ते व पोलिसांना शांत करीत होता. अपवादात्मक प्रकरणातच त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला जात असे. तो स्वत:ला पत्रकारासोबतच मानव अधिकार संघटनेचा पदाधिकारी असल्याचेसुद्धा सांगतो. नेते आणि अधिकाºयांसोबत काढलेले फोटो दाखवून वसुली करतो. पोलिसांच्या हाती लागल्यावरही आरीफच्या वर्तनात कुठलाही बदल आलेला नाही. तो पोलिसांनाच पाहून घेण्याची धमकी देऊ लागला. त्याला मारहाण करून मानवी अधिकारांचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊ लागला. त्याच्या धमकीमुळे पोलीसही चक्रावले आहेत. तो पकडल्या गेल्यावर अनेक पीडितांनी ठाण्यात येऊन आपली व्यथा पोलिसांना सांगितली. आरीफ मूळचा अकोला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.पत्रकारितेशी कुठलाही संबंध नाहीमिळालेल्या माहितीनुसार आरीफचा पत्रकारिता किंवा मीडियाशी कुठलाही संबंध नाही. तो जाहिराती देण्याच्या नावावर रुपये मागत होता. वरिष्ठ पोलिसांनीसुद्धा ठाण्यात जाऊन त्याची विचारपूस केली. बुधवारी त्याला न्यायालयात सादर केले असता त्याने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली. न्यायालयाने सिव्हिल सर्जनकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. तपासणीनंतर त्याला तुरुंगात पाठविण्यात आले. पोलीस गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात सादर करणार आहे. 

टॅग्स :Journalistपत्रकारArrestअटक