शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:37 IST

वाघाच्या अवशेष चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रामटेक तालुक्यातील सिल्लारी येथील पेच प्रकल्पाच्या वन कोठडीत ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देउच्चस्तरीय चौकशीची मागणी : वन कोठडीतून झाला होता पसार

लोकमत न्यूज नेटवर्कपारशिवनी : वाघाच्या अवशेष चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला रामटेक तालुक्यातील सिल्लारी येथील पेच प्रकल्पाच्या वन कोठडीत ठेवण्यात आले होते. हा आरोपी या वन कोठडीतून पळून गेला होता. नऊ दिवसानंतर त्या आरोपीचा मृतदेह पारशिवनी तालुक्यातील ढवलापूर शिवारात शनिवारी दुपारी आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची तसेच आरोपीच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी केली आहे. दुसरीकडे या घटनेमुळे वन अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महादेव चैतराम उईके (४९, रा. ढवलापूर, ता. पारशिवनी) असे मृत आरोपीचे नाव आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी-उसरीपार परिसरात काही दिवसांपूर्वी वाघाचा मृतदेह आढळला होता. त्या वाघाची शिकार करण्यात आल्याचा दावा वन अधिकाºयांनी करीत या शिकारप्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली.आरोपींमध्ये महादेवचाही समावेश होता. त्याला सिल्लारी येथील वन कोठडीत ठेवले होते. तो १८ आॅगस्ट रोजी पहाटे या वन कोठडीतून पळून गेला होता. तेव्हापासून आजवर वन कर्मचारी त्याचा शोध घेत होते. दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवून घातपाताची शक्यताही व्यक्त केली होती. दरम्यान, ढवलापूर-नरहर रस्त्यावरील वाघदेव मंदिराजवळच्या शेतात काही महिला मजुरांना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महादेवचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी तर नरहर, कोलितमारा, ढवलापूर येथील नागरिकांनी पारशिवनी पोलीस ठाणे गाठले.या प्रकारामुळे पोलिसांनी महादेवचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात न आणता परस्पर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये रवाना केला. मृतदेह असलेल्या वाहनात महादेवचा एक नातेवाईक होता. वन अधिकाºयांनी (पेंच व्याघ्र प्रकल्प) त्याला मध्येच वाहनातून उतरवून दिले आणि एका खबºयाला त्या वाहनात घेऊन गेले, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.वन अधिकाºयांच्या विरोधात तक्रारमृत महादेव उईके याच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी पारशिवनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला होता. त्यातच जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह यादव पोलीस ठाण्याच्या आवारात पोहोचले. महादेवचा मृत्यू संशयास्पद असून, घातपाताची शक्यताही त्याच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे यादव यांच्या पुढाकाराने पारशिवनी पोलीस ठाण्यात एसीएफ गीता नन्नावरे, पवनी बफर झोनचे आरएफओ पांडुरंग पाकळे, नागलवाडीचे आरएफओ नीलेश गावंडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली.