शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

सीताबर्डीत आढळला मृतदेह

By admin | Updated: March 23, 2017 02:30 IST

रेल्वे स्थानक मार्गावरील सैन्यदलाच्या परिसराला लागून असलेल्या झुडपी भागात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

सैन्यदलाचा परिसर : दोन्ही हातपाय गायब, हत्येचा संशय नागपूर : रेल्वे स्थानक मार्गावरील सैन्यदलाच्या परिसराला लागून असलेल्या झुडपी भागात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेह कुजलेल्या आणि दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याची हत्या झाली असावी, असा संशय आहे. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मात्र, त्याचा मृत्यू किमान तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मानस चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूला झुडपी भाग आहे. हा भाग सैन्यदलाच्या परिसरात येतो. फोर्ट लाईन ११८ बटालियनचे जवान फकीर मेहबूब हसन (वय ३७) हे मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास परिसरात गस्त करीत असताना त्यांना तीव्र दुर्गंधी आली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह झुडपात बघितले असता एक मृतदेह आढळला. मृतदेह पुरता कुजलेला होता. शरीराला दोन्ही हात नव्हते. पायही गायब होता. शरीराचा काही भाग जळाल्यासारखा दिसत होता. ही माहिती फकीर यांनी आपल्या वरिष्ठांना आणि सीताबर्डी ठाण्यात कळविली. लगेच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेहाची अवस्था बघून हत्या झाल्याचा संशय अनेकांनी घेतला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो मेडिकलमध्ये पाठविला. सैन्यदलाच्या संवेदनशील भागात अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने पोलिसही हादरले. त्यांनी डॉक्टरांना तातडीने शवविच्छेदन अहवाल मागितला. मात्र, मृतदेहाची एकूणच अवस्था बघून डॉक्टरांनी निश्चित अहवाल लगेच देता येणे शक्य नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) मृत नशेडी मृताच्या कपड्यात पोलिसांना टायरचा पंक्चर जोडण्यासाठी वापरली जाणारी सोल्युशनची ट्यूब आढळली. कचरा वेचणारे, भीक मागणारे, छोटे-मोठे गुन्हेगार या सोल्युशनचा नशेसाठी वापर करतात. त्यामुळे मृत व्यक्ती नशेडी असावा, असा अंदाज पोलिसांनी काढला. मात्र, त्याची हत्या झाली की नशेच्या अवस्थेत तो त्या भागात पोहोचला आणि त्याचा मृत्यू झाला, त्याबाबत पोलीस ठोस निष्कर्ष काढू शकले नाही. संबंधित परिसरात जंगली जनावरे आहेत. त्यामुळे जनावरांनी त्याच्या पायाचा, डोक्याच्या केसाचा भाग खाल्ल्याचे पोलीस सांगतात. तूर्त याप्रकरणी फकीर यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.