शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीएमडब्ल्यू चालकाने घातला धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : सांभाळून कार चालविण्याचा सल्ला दिल्यामुळे संतप्त झालेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाने एका युवकाला जखमी केले. ही घटना शांतिनगर ...

नागपूर : सांभाळून कार चालविण्याचा सल्ला दिल्यामुळे संतप्त झालेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाने एका युवकाला जखमी केले. ही घटना शांतिनगर ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी बीएमडब्ल्यूच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.

शांतिनगर कॉलनीतील रहिवासी प्रकाश हुंदनानी ९ मार्चला रात्री ११ वाजता आपल्या घरासमोर बसले होते. त्यावेळी सिल्व्हर रंगाच्या बीएमडब्ल्यू कारचा चालक बेजबाबदारपणे कार चालवून धुमाकूळ घालत जात होता. दाट लोकवस्ती असल्यामुळे प्रकाशला नागरिक बीएमडब्ल्यूमुळे अपघातग्रस्त होण्याची शंका आली. त्यांनी आपल्या मित्रासोबत अ‍ॅक्टिव्हावर कारचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी बीएमडब्ल्यू चालकास थांबविले. प्रकाशने बीएमडब्ल्यू चालकास कार सांभाळून चालविण्याचा सल्ला दिला. त्यांचा हात कारच्या खिडकीवर होता. हे पाहून बीएमडब्ल्यू चालकाने खिडकीचा काच बंद केला. त्यामुळे प्रकाशचे बोट काचात अडकले. त्यानंतर कार वेगाने पुढे नेली. बोट काचात अडकल्यामुळे प्रकाश काही अंतर घासत गेले. त्यांच्या डोक्यावर व पायावर गंभीर जखम झाली. प्रकाशने शांतिनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेजबाबदारपणे वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांच्या मते, परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. वाहन चालक नागरिकांची पर्वा न करता वाहन चालवितात. कार मुंबई पासिंगची आहे. परिसरातील सीसीटीव्हीत कारचा क्रमांक ५०५८ असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत. शांतिनगर परिसरातील नागरिक असामाजिक तत्त्वांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी पोलिसांना वेळोवेळी तक्रारही केली आहे.

...............