लोकमत न्यूज नेटवर्कवाडी : तरुणाचा गळा तलवारीने कापून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वाडी परिसरात मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली. मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत झालेल्या भांडणातून मित्रानेच त्याचा खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे.अजय ऊर्फ लांच्छा काशीनाथ रामटेके (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांचे बालपणीच निधन झाल्याने त्याला स्वत:चे घर नव्हते. अजय हा फुटाळा, नागपूर येथील खाद्यपदार्थाच्या ठेल्यावर काम करायचा आणि रात्री त्याचा मित्र राहुल किशोर वंजारी, रा. सुराबर्डी याच्या सुराबर्डी शिवारात हॉटेलमध्ये झोपायला जायचा. राहुल हा अजयचा मोठा भाऊ विजय रामटेके याचा मित्र असून, विजय हा कोंढाळी (ता. काटोल) येथे राहतो.सोमवारी राहुलच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्याने रात्री पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अजय व राहुलचे अज्ञात कारणावरून भांडण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, मंगळवारी दुपारी वाडी परिसरातील गोदामाजवळ असलेल्या झुडपात अजयचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा तलवारीने कापला असल्याचे निदर्शनास आले. त्यातच राहुलने विजयला ‘तेरे भाई को टपकाया’ असे फोनवरून सांगितले. त्यामुळे अजयचा खून राहुलने केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
वाडीत तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:32 IST
तरुणाचा गळा तलवारीने कापून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वाडी परिसरात मंगळवारी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
वाडीत तरुणाचा खून
ठळक मुद्देतलवारीने कापला गळा : मित्राने घात केल्याचा संशय