शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर

By admin | Updated: July 1, 2016 02:52 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर शनिवार २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’चा अकरावा मजला येथे घेण्यात येणार आहे. निरंतर निष्काम कर्म आणि सेवा कार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत लोकमतच्यावतीने वर्षभर सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंभीर आजाराच्या रुग्णाला किंवा अपघातात जखमी झालेल्यांना रक्ताची नितांत आवश्यकता असते. रक्तदात्याकडून मिळालेले रक्तच त्यांचे जीवन वाचवू शकते, म्हणूनच रक्तदान सर्वदानात श्रेष्ठ आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीतजास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषत: ‘लोकमत’चे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी व रक्तदान करणाऱ्यांनी लोकमत भवन रामदासपेठ येथे किंवा फोन नं. २४२९३५५, ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ वर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)रक्तदात्यांसाठी भेटवस्तू व प्रमाणपत्रकुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे असते. म्हणूनच दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.