शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टपूर्वी तस्करांची नाकाबंदी

By admin | Updated: December 31, 2016 02:54 IST

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील सर्व अतिसंवेदनशील स्थळांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नागपूर : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील सर्व अतिसंवेदनशील स्थळांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शुक्रवारी रात्री अंदाजे दोन कोटी रुपयांची महागड्या विदेशी दारूची तस्करी पकडली. रेल्वेस्थानकावर सकाळी ७१ किलोच्या गांजाची तस्करीही उजेडात आली तर चंद्रपूरकडे जाणाऱ्या ३१२ दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरपीएफच्या या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. ७ लाखांचा गांजा पकडला तीन महिलांना अटक दक्षिण एक्स्प्रेसने दिल्लीला ७ लाख ६९ हजार रुपये किमतीच्या ७३ किलो ५०० ग्रॅम गांजाची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास जनरल वेटिंग हॉलमध्ये घडली. रेल्वे सुरक्षा दलाचा जवान रजनलाल गुजर, विकास शर्मा यांना रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ दक्षिण एक्स्प्रेसने दिल्लीला गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक होती लाल मिना, कृष्णा नंद राय, विकास शर्मा, आरपीएफ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अरुण ठवरे, दीपक वानखेडे, विजय पाटील, किशोर चौधरी यांची चमू गठित करण्यात आली. या चमूने लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर आणि त्यांच्या चमूसोबत दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी तीन महिला जनरल वेटिंग हॉलमध्ये बॅग घेऊन संशयास्पद अवस्थेत आढळल्या. आरपीएफचा श्वान रेक्सच्या साहाय्याने त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. कुसुम शेख (५०) रा. तिलडंगा प. बंगाल, सीमा आबु कलाम (५०) मद्रासी कॉलनी दिल्ली आणि चंद्रिका वेलु स्वामी (४३) मद्रासी कॉलनी दिल्ली अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. गांजा आणि अटक केलेल्या महिलांना लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर वाडेकर, खुशाल शेंडगे, किशोर चांभारे, योगेश धुरडे, प्रवीण भिमटे, प्रशांत शिंदे करीत आहेत. बॅगमधील तस्करी उजेडात रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दारूच्या १४ हजार ४५० रुपये किमतीच्या ३१२ पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ३१ डिसेंबरनिमित्त दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना मिळाली. त्यांनी याबाबतची सूचना वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, हेमराज वासनिक, राजू खोब्रागडे, प्रवीण चव्हाण, नीलकांत गोरे, दीपक वानखेडे यांची चमू गठित केली. चमूला प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर मुंबई एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या १२२ बाटल्या आणि आॅफिसर चॉईस कंपनीच्या १९० बाटल्या आढळल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत १४ हजार ४५० रुपये आहे. कागदोपत्री कारवाईनंतर ही दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.(प्रतिनिधी) थर्टी फर्स्टसाठी रेल्वेमार्गाने दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, उपनिरीक्षक अरुण ठवरे यांना मिळाली. त्यांनी लगेच आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांना ही माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णानंद राय, होती लाल मिना, आरपीएफ जवान विकास शर्मा, विनोद राठोड आणि जवळपास २५ जवानांची चमू गठित करण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस रात्री ८.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आल्यानंतर आरपीएफच्या चमूने या गाडीच्या पार्सल बोगीची झडती घेणे सुरू केले. या बोगीतून दारूच्या पेट्या उतरविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. त्यानंतर रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस प्लॅटफार्म क्रमांक दोनवर आली. या गाडीच्या पार्सल बोगीतूनही जवळपास दारूच्या ७५ पेट्या उतरविण्यात आल्या. या पेट्यातील दारू अतिशय महागडी असल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रेल्वे सुरक्षा दलाने या पेट्या फोडून त्यातील दारूच्या बाटल्याची संख्या आणि किंमत काढण्याचे काम सुरू केले होते.