शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दारू विक्रेत्यांची नाकाबंदी

By admin | Updated: June 29, 2015 03:01 IST

लकडगंज पोलिसांनी गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीतून मोठ्या प्रमाणावर विषारी गावठी दारू जप्त केली. दुसरीकडे मुंबई विषारी दारूकांडापासून धडा घेत ...

लकडगंजमध्ये विषारी दारू जप्त : गुन्हे शाखेची कारवाई नागपूर : लकडगंज पोलिसांनी गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीतून मोठ्या प्रमाणावर विषारी गावठी दारू जप्त केली. दुसरीकडे मुंबई विषारी दारूकांडापासून धडा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने उपराजधानीतील विविध भागात धाडी घालून मोठा गावठी दारूचा साठा जप्त केला. दोन दिवसांत २७ गावठी दारू विक्रेत्यांनाही अटक करण्यात आली. गंगाबाई घाट स्वीपर कॉलनीत राहणारा आरोपी राजू चंद्रशेखर जोशी (वय २४) हा गावठी दारूत विषारी पदार्थ मिसळून विकत असल्याची माहिती पोलिसांना कळली. पिणाऱ्यांना जास्त आणि प्रदीर्घ झिंग चढावी या हेतूने गावठी दारू विक्रेते दारूत बेशरमचा पाला किंवा विषारी पावडर अथवा द्रव मिळवतात. राजू असेच करीत असल्याचे कळाल्याने लकडगंज पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे धाड घातली.यावेळी त्याच्याकडे २५ लिटर हातभट्टीची दारू आढळली. ही दारू सेवन केल्यास त्यापासून विषबाधा होऊन पिणाऱ्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी माहिती असूनही आरोपी विषारी दारू विकत असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२५० रुपयांची दारू, कूलर आणि अन्य साहित्यांसह ४,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जोशीविरुद्ध लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)अवैध दारू करू शकते घात राजधानी मुंबईत १०० पेक्षा अधिक लोकांचा बळी घेणारी अवैध आणि भेसळयुक्त दारू उपराजधानीलाही आपल्या जाळ्यात घेऊ शकते. शहरात अवैध दारू व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. पोलीस आणि अबकारी विभागाच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय वाढत आहे. येथूनच वर्धा आणि चंद्रपुरातसुद्धा अवैध दारू पाठविली जात आहे. लोकमतने शहरातील अवैध दारू व्यवसायाची माहिती काढली असता जी वस्तुस्थिती समोर आली ती आश्चर्यचकित करणारी आहे. शहरातील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये दारू माफियांचे वर्चस्व आहे. भेसळयुक्त दारू केवळ १० रुपये ग्लास विकली जाते. त्यामुळे कुणीही सहजपणे दारूच्या नावावर विष प्राशन करू शकतो. अशापरिस्थितीत मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती कधी होईल, हे सांगता येत नाही. भेसळयुक्त दारू माफियांची पाळेमुळे इतकी मजबूत झाली आहेत की ते पोलिसांची अजिबात चिंता करीत नाहीत. या व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची कमाई होते. त्यामुळे मालामाल करणाऱ्या या व्यवसायाला मदत करणे पोलीस आणि अबकारी विभागाही आपले ‘कर्तव्य’ समजू लागले आहे. गुन्हे शाखेचे धाडसत्रअशाच प्रकारे गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीतील विविध भागात धाडसत्र राबवून हातभट्टीची शेकडो लिटर दारू जप्त केली. शुक्रवारी नंदनवन, अंबाझरी, सदर, पाचपावली, गिट्टीखदान, अजनी, इमामवाडा, हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी घालून १३ जणांना अटक करण्यात आली. तर, शनिवारी अंबाझरी, सदर, पाचपावली,जरीपटका, गणेशपेठ, कळमना, धंतोली, नंदनवनमध्ये धाडी टाकून १४ दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १७, ३४५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.