शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

अंधांनी गुंफली स्वरांची माळ अन् रसिकही घायाळ

By admin | Updated: May 5, 2015 02:04 IST

हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगात मनाला आल्हादित करणारे एक अदृश्य संगीत सदैव निनादत असते. डोळस माणसांना त्या अदृश्य संगीताचे दर्शन घडेलच याची शाश्वती नसते.

नागपूर : हे जग सुंदर आहे आणि या सुंदर जगात मनाला आल्हादित करणारे एक अदृश्य संगीत सदैव निनादत असते. डोळस माणसांना त्या अदृश्य संगीताचे दर्शन घडेलच याची शाश्वती नसते. पण दृष्टी गमावून सृष्टीचे दर्शन ज्यांना प्रत्यक्ष घेता येत नाही त्यांना मात्र सृष्टी निनादणाऱ्या या संगीताची जाणीव सदैव होत असते. म्हणूनच असेल कदाचित सोमवारी विष्णुजी की रसोई येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीताच्या कार्यक्रमात अंध कलावंतांनी डोळसांनाही लाजवेल अशी सुरेल स्वरांची माळ गुंफली. या कलावंतांच्या उत्कृष्ट गायकीने उपस्थित रसिकांनी मनमोकळेपणाने दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला. मैत्री परिवार संस्था व विष्णुजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने अंध कलावंतांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील गायक आणि वादक दोघेही दृष्टीबाधित होते. (प्रतिनिधी) स्वरांनी त्यांच्या जगण्याला प्रकाशमान केले. अंध असतानाही नेमकेपणाने स्वर ओळखत विविध वाद्यांवर लीलया फिरणारी त्यांची बोटे आणि स्वरांवरची घट्ट पकड या कलावंतांच्या सादरीकरणाला दाद द्यायला भाग पाडणारी होती. शिबा बेग, जियाउद्दीन, सोनाली मिलमिले, अनिकेत बेंडे, मयंक शाहू, पूजा मिलमिले या अंध कलावंतांनी मराठी आणि हिंदी गीतांना अतिशय नजाकतीने सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात जिया व अनिकेतने गणेशवंदनेने केली. पुढे एकाहून एक सुरेल गीतांचा कारवाँ सुरू झाला. तेरी दिवानी..., मेरे सपनों की राणी..., बाबुजी धीरे चलना..., अब तुम ही हो..., मै तेनु समझावा की..., सुरिली अखियोंवाली..., या गीतांना कलावंतांनी ताकदीने सादर केले. अनेक गीतांना तर वन्समोरची दाद मिळाली. आता वाजले की बारा..., उगवली शुक्र ाची चांदणी... या लावण्याही जबरदस्त सादर झाल्या. या गायक कलावंतांपैकी काही वादकही होते. आॅर्गन वाजविणारा मयंक च्या गळ्यातील गोडवा, त्याने सादर केलेल्या गीतातून रसिकांनी अनुभवला. किशोर चौधरीने तबल्यावर लावलेला ठेका उपस्थितांना आश्चर्यचकित करून गेला. कार्यक्रमात २१ गीत सादर करण्यात आले. वाद्यावर सुरेंद्र पथे, किशोर चौधरी, अनिकेत बेंडे, मयंक शाहू यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन असीधरा लांजेवार हिने केले. (प्रतिनिधी)