शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

खाली बीअरबार, वर कुंटणखाना

By admin | Updated: November 1, 2014 02:48 IST

कामठी मार्गावरील चांदनी बीअर बारच्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर आज गुन्हेशाखेच्या सामाजिक ...

नागपूर : कामठी मार्गावरील चांदनी बीअर बारच्यावर चालणाऱ्या कुंटणखान्यावर आज गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने धाड घातली. पोलिसांनी येथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांसह आठ जणींना ताब्यात घेतले. शिवाय त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या बारमालक आणि व्यवस्थापकालाही अटक केली. या कारवाईमुळे घटनास्थळ परिसरात आज सायंकाळी प्रचंड खळबळ उडाली होती. कामठी मार्गावर चांदनी बीअर बार आहे. बारच्या वरच्या माळ्यावर हॉटेल, लॉजिंग आहे. येथे कुंटणखाना चालविला जात होता. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सर्वच व्यवस्था असल्यामुळे येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. ही माहिती कळताच गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमूख बाजीराव पवार यांनी कारवाईसाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी ४.३० च्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. त्यांनी लॉजचा मालक सुनील बापुराव माकडे (वय ४६) आणि व्यवस्थापक किशोर रामदासजी पोटभरे (वय २६) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विशिष्ट रक्कम घेऊन तरुणी उपलब्ध करून दिल्या. ग्राहक तरुणींसह खोल्यांमध्ये गेले आणि ठरल्याप्रमाणे काही वेळेनंतर पीआय बाजीराव पोवार, एपीआय अमिता जयपूरकर, पीएसआय आर. एन. कोहळे, एएसआय गोविंद मदने, सुरेश पंधरे, रामानंद ठाकूर, हवालदार पांडुरंग निकुरे, नायक गोपाल वैद्य, अजय घाटोळ, सय्यदभाई, नीलेश वाडेकर, बळीराम रेवतकर, अस्मिता मेश्राम, अनिता धुर्वे, निता डवरे, बाल संरक्षण अधिकारी साधना सुरेश हटवार आणि मुस्ताक सत्तार खान पठाण यांनी लॉजवर धाड घातली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या आठ जणी पोलिसांना मिळाल्या. पोलिसांनी त्यांना तसेच बारचा संचालक सुनील माकडे आणि व्यवस्थापक किशोर पोटभरे यांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)