शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅकलिस्टेड’ कंपनीच बनविणार सिमेंट रोड !

By admin | Updated: June 27, 2016 02:51 IST

शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निविदा भरणाऱ्या मे. अभि इंजिनिअरिंगला नागपूर महापालिकेने दोन

नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निविदा भरणाऱ्या मे. अभि इंजिनिअरिंगला नागपूर महापालिकेने दोन पॅकेजचे काम दिले आहे. विशेष म्हणजे गुणवत्ताहीन काम केल्याच्या मुद्यावरून मुंबई महापालिकेने या कंपनीसह चार कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्टेड’ (काळ्या यादीत टाकले) केले आहे. या कंपनीची प्रतिमा मलिन असल्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत ताशेरे ओढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासनाने कायदेशीर सल्ला घेतला व त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला काम देण्यावर एकमत झाले. आता २७ जून रोजी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणाऱ्या या प्रस्तावात उल्लेख आहे की, अभि इंजीनियरिंग कार्पोरेशनमध्ये १ आॅक्टोबर २००४ पासून २ सप्टेंबर २०१३ पर्यंत एकूण ७ भागीदार फर्म होत्या. भागीदारीची मुदत संपल्यामुळे आता मे. अभि इंजीनियरिंग कार्पोरेशन प्रा. लिमिटेड नावाने कंपनी बनविण्यात आली आहे. कंपनीची तशी नोंदणीही करण्यात आली आहे. मे. अभि इंजीनियरिंग कार्पोरेशन नागपूर ची राज्याच्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातही नोंदणी आहे. याची वैधता २८ आॅगस्ट २०१६ पर्यंत आहे. संबंधित कंपनीने ५ सप्टेंबर २०१५ रोजी महापालिकेत वर्ग १ कंत्राटदार म्हणून नोंदणी केली आहे. मिळालेल्या कायदेशीर सल्ल्यात असे नमूद आहे की, कंपनीने नियमानुसार निविदा प्रक्रियेत भाग घेतला आहे. कंपनीवर लागलेले आरोप योग्य नाहीत. एक प्रकरण न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कंत्राटदाराकडून हमीपत्र घेतले जाईल. काही अटींवर संबंधित कंत्राटदाराला काम देण्याची तयारी महापालिकेने केली आहे. संबंधित कंपनीला सीमेंट काँक्रिट रोड टप्पा- २ च्या पॅकेज २ अंतर्गत दक्षिण अंबाझरी रोड ते माटे चौक व अंबाझरी टी पॉर्इंट ते मंगलमूर्ती चौक ते शीतला माता मंदिर पर्यंत, आरपीटीएस ते माधवनगर चौक मार्गे वेस्ट हाईकोर्ट रोड पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम १७.४६ कोटी रुपयांमध्ये दिले आहे. त्याचप्रकारे पॅकेज- १ अंतर्गत दक्षिण अंबाझरी रोड ते वर्धा रोड मार्गे रहाटे कॉलनी टी पॉर्इंट ते माटे चौकापर्यंत सीमेंट रोडसाठी ११.६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे. (प्रतिनिधी)चिंचभुवन, हुडकेश्वर, नरसाळासाठी टीपी स्कीममौजा चिंचभुवन, मौजा हुकेश्वर व मौजा नरसाळा येथील भागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी महापालिकेने टीपी स्कीम (नगर विकास योजना) लागू करण्याची तयारी केली आहे. नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५९ ते ११२ अंतर्गत नगर रचना प्रकल्पाची टीपी स्कीम तयार करण्यात आली आहे. संबंधित भागात टीपी स्कीमच्या अंमलबजावणीवर अभ्यास करण्यासाठी अनुभवी तांत्रिकी तज्ज्ञाची नियुक्ती केली जाईल. यासाठी १.५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.