शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड तालुक्यात भाजपाची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

कळमन्यात अविरोध, कुठे गुप्त तर कुठे हात उंचावून मतदान उमरेड : काँग्रेसने विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपला ...

कळमन्यात अविरोध, कुठे गुप्त तर कुठे हात उंचावून मतदान

उमरेड : काँग्रेसने विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपला चारीमुंड्या चित केल्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने काँग्रेसचा विजयरथ रोखला. तालुक्यातील १४ पैकी ११ ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच विजयी ठरले, तर केवळ तीन ग्रामपंचायतींवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. कळमना (बेला) ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाची निवडणूक अविरोध झाली. कुठे गुप्त तर कुठे हात उंचावून मतदान लक्षवेधी आणि अटीतटीचे ठरले.

उमरेड तालुक्यातील खुर्सापार (बेला), कळमना (बेला), शेडेश्वर, चनोडा, मटकाझरी, बोरगाव लांबट, विरली, शिरपूर, नवेगाव साधू, सावंगी खुर्द, खैरी चारगाव या एकूण ११ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकविला. दुसरीकडे किन्हाळा, सालईराणी, खुर्सापार (उमरेड) या केवळ तीन ग्रामपंचायती मिळविण्यात काँग्रेसला यश आले आहे. ग्रामीण काँग्रेसमध्ये निर्माण झालेली दुफळी पक्षाच्या पराभवाला कारणीभूत मानली जात आहे. दुसरीकडे माजी आमदार सुधीर पारवे यांची सावधगिरीची खेळी आणि नियोजनबद्ध रणनीती याचा लाभ त्यांच्या पक्षाला झाला असल्याचे बोलले जात आहे.

-----------

आणि ठरल्या अविरोध

उमरेड तालुक्यातील कळमना (बेला) या ग्रामपंचायतीमध्ये मनीषा पद्माकर नेवारे या अविरोध सरपंच ठरल्या. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एका सदस्याने दांडी मारली. अन्य सहा सदस्यांनी हात उंचावून भाजप समर्थित मनीषा नेवारे यांना पसंती दिली. याच ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच झालेले संजय भाकरे यांना निवडणुकीचा सामना करावा लागला, हे येथे विशेष. दुसरीकडे किन्हाळा ग्रामपंचायतमधील वॉर्ड क्रमांक ३ ब मधून भारती नितीन भगत अविरोध ठरल्या होत्या. त्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीतसुद्धा अविरोध आल्या.

अन् लगेच भाजपात उडी

उमरेड तालुक्यातील सावंगी खुर्द येथे एकूण सदस्यसंख्या सात आहे. यापैकी भाजप समर्थित तीन, काँग्रेस समर्थित दोन आणि अपक्ष म्हणून दोन ग्रामपंचायत सदस्य विजयी ठरले होते. सरपंच कुणाचा, असा कठीण पेच निर्माण झाला होता. अखेरीस भाजपा समर्थित उमेदवाराला कॉँग्रेस समर्थित एका सदस्याचा पाठिंबा मिळाल्याने याठिकाणी भाजपाचे गणित जमले. निवडणुकीपूर्वी मंगला भजभुजे यांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडला होता. सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपाला साथ दिली. मंगला भजभुजे यांना उपसरपंच पदाचा लाभ मिळाला.

--

कुठे गुप्त तर कुठे हात उंच

सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत हात उंचावून आणि गुप्त मतदान, असे दोन पर्याय उपलब्ध होते. तालुक्यातील एकूण १४ ग्रामपंचायतींपैकी विरली, मटकाझरी, सावंगी (खुर्द), शिरपूर, बोरगाव (लांबट), चनोडा या एकूण सहा ग्रामपंचायतींमध्ये गुप्त मतदान करण्याची मागणी सदस्यांनी केली. उर्वरित खुर्सापार (उमरेड), खुर्सापार (बेला), सालईराणी, कळमना (बेला), शेडेश्वर, किन्हाळा, खैरी (चारगाव), नवेगाव (साधू) या आठ ग्रामपंचायतींमध्ये हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पार पडली.

प्रशासन चौकस

निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार (निवडणूक) टी. डी. लांजेवार यांच्या नेतृत्वात प्रदीप वरपे, अश्विनी नंदेश्वर, मेगनाथ सहारे, मधुकर वाघ, सी. पी. साटकर, एम. जी. माने, जे. यू. पाटील, राम जुमडे, आदेश बागेश्वर, एम. के. भुरे, सतीश बोसीकर, सुनील मोवाडे, विलास अमृते आणि राहुल बहादूरकर यांनी ग्रामपंचायतनिहाय अध्यासी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.