शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा सभापती

By admin | Updated: March 31, 2017 02:53 IST

महापालिकेच्या आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे सभापती म्हणून निवडून आल्या.

आसीनगरात बसपाला रोखले : मंगळवारीत भाजपासाठी बसपाची माघारनागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे सभापती म्हणून निवडून आल्या. दुसरीकडे मंगळवारी झोनमध्ये बसपा उमेदवाराने निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याने भाजपाच्या सुषमा चौधरी यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात गुरुवारी आयोजित बैठकीत आसीनगर व मंगळवारी झोन सभापतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. आसीनगर झोन सभापती पदासाठी भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे, काँग्रेसच्या भावना लोणारे व बसपाच्या वैशाली नारनवरे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. झोनमधील १६ सदस्यांपैकी बसपाचे ७, काँग्रेसचे ६ तर भाजपचे ३ सदस्य आहेत. संख्याबळाचा विचार करता कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने काँग्रेस व बसपा यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु बसपा व काँग्रेसमधील पडद्यामागील चर्चा फिस्कटल्याने काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बसपाच्या वैशाली नारनवरे यांना सात तर भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे यांना आठ मते मिळाली. काँग्रेसचे संदीप सहारे अनुपस्थित होते. भावना लोणारे यांना एकही मत मिळाले नाही. त्यांनी स्वत:चे मत भाजपाच्या बाजूने दिले. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा सभापती झाल्याने मंगळवारी झोनमधून बसपाचे संजय बुर्रेवार यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपाच्या सुषमा चौधरी यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभागृहात बहुमत नसतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विरोधात बसपाने निवडणूक लढविली होती. परंतु मंगळवारी झोनमध्ये बसपाची वेगळीच भूमिका दिसून आली.(प्रतिनिधी)बसपाला रोखण्याचे षड्यंत्रआसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी संगनमताने बसपाला रोखण्यासाठी युती के ल्याचा आरोप बसपाचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी केला आहे. आसीनगर झोनमध्ये बसपाचे सर्वाधिक सात नगरसेवक आहेत. आंबेडकरी विचाराला रोखण्यासाठी भाजपा व काँगे्रस एकत्र आले. काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर बसपाचा उमेदवार सहज निवडून आला असता. परंतु काँग्रेस व भाजपा हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जयकर यांनी दिली. काँग्रेस -बसपा नेत्यांनी प्रयत्नच केले नाहीसंख्याबळाचा विचार करता आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपा यांच्यात समझोता झाला असता तर दोन्ही ठिकाणी या पक्षाचे सभापती निवडून आले असते. परंतु दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या संदर्भात पुढाकारच घेतला नाही. या संधीचा फायदा घेत भाजपाने दोन्ही झोनवर आपला कब्जा केला. काँग्रेस कमिटीला अहवाल देणारभाजपाला रोखण्यासाठी आसीनगर झोनमध्ये बसपाच्या उमेदवाराला मतदान करावे. किवा तटस्थ राहण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. याबाबतच्या सूचना पक्षाच्या नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या. परंतु मतदान करताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपा उमेदवाराला मतदान केले. याची चौकशी करून याबाबतचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीला सादर करू.- संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते महापालिका