शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम मतांसाठी भाजपाचे ‘सोशल इंजिनिअरिंग’

By admin | Updated: January 18, 2017 02:16 IST

‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’वर

प्रचारासाठी विशेष पथक : इच्छुक उमेदवारांच्या संख्येत यंदा वाढ योगेश पांडे  नागपूर ‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’वर जास्त भर दिला आहे. एरवी मुस्लीम मतदार पक्षापासून दूर असतात. मात्र ही मते मिळविण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. अल्पसंख्यक संपर्क समितीच्या माध्यमातून मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्यात येत आहे. विशेष म्हणजे तिकिटासाठी इच्छुक मुस्लीम उमेदवारांची संख्यादेखील यंदा वाढीस लागली आहे. हिंदुत्वाचा नारा देत भाजपाने निवडणुकांच्या रिंगणात यश मिळविले. मात्र लोकसभा निवडणुकांअगोदर ‘सोशल इंजिनीअरिंग’वर भर देत मुस्लीम मतदारांची मते मिळविण्यासाठी पहिल्यांदाच गंभीरतेने विचार करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान यासाठी स्वत: पुढाकार घेतला. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्याचे प्रत्यंतर दिसून आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत मुस्लीम मतदारांनी साथ दिली होती. मात्र मनपा निवडणुकांचे गणित व मुद्दे पूर्णत: वेगळे असतात. हीच बाब लक्षात ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात मुस्लीम मतदार पक्षाकडे आकर्षित व्हावेत, यासाठी अल्पसंख्यक संपर्क समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या समितीमध्ये श्रीकांत देशपांडे, भोजराज डुंबे, जमाल सिद्दीकी, फिरोज शेख यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ९४ इच्छुकांनी मागितले तिकीट मनपा निवडणुकांत मुस्लीम उमेदवारांना तिकीट देण्यासंदर्भात पक्ष सकारात्मक आहे, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आला होता. त्याचाच परिणाम म्हणून पक्षाकडे जास्त प्रमाणात मुस्लीम उमेदवारांनी तिकिटासाठी अर्ज केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९४ जणांनी अर्ज केले होते. यात २२ महिलांचादेखील समावेश आहे. बहुतांश इच्छुक हे मुस्लिमबहुल भागातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.