शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

उपमहापौरपदी भाजपचे सतीश होले

By admin | Updated: May 3, 2016 03:33 IST

नागपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी नागपूर विकास आघाडीचे सतीश होले विजयी झाले. त्यांना ७९ मते मिळाली

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी नागपूर विकास आघाडीचे सतीश होले विजयी झाले. त्यांना ७९ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात लढणारे बसपाचे सागर लोखंडे यांना ४१ मते मिळाली. लोखंडे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. सोमवारी महाल नगरभवन येथे आयोजित महापलिकेच्या विशेष सभेत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. उपमहापौरपदासाठी नागपूर विकास आघाडीतर्फे सतीश होले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नागुलवार व बसपाचे सागर लोखंंडे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु नागुलवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने होले व लोखंडे यांच्यात लढत झाली. महापालिकेत १४५ नगरसेवक आहेत. यातील १२५ सदस्य उपस्थित होते. परंतु सभागृहात उशिरा पोहचल्याने पाच सदस्यांना निवडणूक प्रक्रि येपासून वंचित राहावे लागले. यात पुरुषोत्तम हजारे, विद्या लोणारे, अरुण डवरे, प्रकाश गजभिये व बंडू तळेवकर आदींचा समावेश आहे. लोखंडे यांचा पराभव झाला असला तरी काँग्रेस, बसपा व राष्ट्रवादी काँग्रेस या निमित्ताने एकत्र आले आहेत. सभागृहात नागपूर विकास अघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने होले यांचा विजय निश्चित होता. त्यामुळे ४१ सदस्य संख्या असूनही काँग्रेसने उपमहापौरपदाची निवडणूक न लढविता बसपाला पाठिंबा देण्याची खेळी खेळली. गेल्या वेळी सतीश होले काँग्रसचे नगरसेवक होते. परंतु निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. गेल्या चार वर्षात भाजपने त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद न दिल्याने ते नाराज होते. पुढील वर्षात होणाऱ्या निवडणुका विचारात घेऊ न उपमहापौरपद देऊ न त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी स्थायी समितीवर जाण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच या पदाचा राजीनामा सोपविला होता. त्यामुळे या पदाची निवडणूक घेण्यात आली. आघाडीच्या उमेदवाराला विजयी केल्याबाबत महापौर प्रवीण दटके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शिवसेनेत फूट ! शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर यांनी उपस्थित असूनही मतदानात भाग घेतला नाही. पक्षाचे गटनेते किशोर कुमेरिया व अलका दलाल सभेला हजर नव्हते. कुमेरिया यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले. मात्र जगतराम सिन्हा, मंगला गवरे व शीतल घरत यांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. यावरून शिवसेनेत फूट असल्याचे निदर्शनास आले.मतमोजणीचा संभ्रमसभागृहात १४५ पैकी १२५ सदस्य उपस्थित होते. परंतु मतमोजणी करताना १२० सदस्यांनी मतदान केले होते. त्यामुळे मतमोजणी करणारे अधिकारी संभ्रमात पडले. उपस्थितांपैकी पाच सदस्यांनी मतदानात सहभाग न घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर संभ्रम संपला.२० सदस्य अनुपस्थित उपमहापौरपदाची निवडणूक असूनही विशेष सभेला २० सदस्य अनुपस्थित होते. यात भाजप, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच प्रमुख पक्षासह अपक्ष सदस्यांचा समावेश होता. चांगले काम करण्याचा प्रयत्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी उपमहापौरपदाची जबाबदारी सोपविली. या पदावर राहून शहर विकासाची चांगली कामे करण्याचा प्रयत्न करू. सतीश होले, उपमहापौर