शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकांच्या टेक्याने उपाध्यक्षपदी भाजपचे फलके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : दुभंगलेल्या भाजपच्या राजकीय फाटाफुटीच्या जखमेवर मीठ चोळत ऐनवेळी भाजप नगरसेवकाला काँग्रेसने टेकू दिला. जबरदस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : दुभंगलेल्या भाजपच्या राजकीय फाटाफुटीच्या जखमेवर मीठ चोळत ऐनवेळी भाजप नगरसेवकाला काँग्रेसने टेकू दिला. जबरदस्त रस्सीखेच झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक गंगाधर फलके यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांनी भाजपच्याच अरुणा हजारे यांचा १७ विरुद्ध ९ अशा मतांनी पराभव करीत आश्चर्याचा धक्का दिला. या संपूर्ण नाटकीय राजकीय घडामोडीनंतर भाजपात सन्नाटा पसरला असून, काँग्रेसने नगर पालिकेच्या बाहेर पक्षाचा ध्वज उंचावत फटाके फोडले.

गंगाधर फलके यांना १७ तर अरुणा हजारे यांना ९ मते मिळाली. काँग्रेसचे सुरेश चिचमलकर यांना एकही मत मिळाले नाही. उमरेड पालिकेत भाजपची सदस्यसंख्या १९ तर काँग्रेसची संख्या ६ असून नगराध्यक्षपदही भाजपकडेच आहे.

गुरुवारी (दि.२६) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी भाजपच्या वतीने गंगाधर फलके, अरुणा हजारे आणि श्रीकृष्ण फलके या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसच्या वतीने सुरेश चिचमलकर यांनी अर्ज भरला. सरतेशेवटी श्रीकृष्ण जुगनाके यांनी माघार घेतली.

निवडणुकीत हात उंचावून मतदानाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भाजपचे गंगाधर फलके यांनी तब्बल १७ मते घेत बाजी मारली. काँग्रेसच्या ६ नगरसेवकांनी फलके यांना मतदान केले. दुसरीकडे भाजपाच्याच अरुणा हजारे यांना पराभवास सामोरे जावे लागले. हजारे यांना नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांनी मतदान केले. एकूणच उपाध्यक्षपदाची निवडणूक भाजप विरुद्ध भाजप सोबतीला काँग्रेसचा ‘हात’ आणि ‘साथ’ मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

....

पडद्यामागील हालचाली

नगर पालिकेत भाजपची एकतर्फी सत्ता असताना मागील काही दिवसापासून पडद्यामागे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. गटातटात दुभंगलेल्या भाजपला चांगलाच फटका बसला. पक्ष उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यास कारवाई करण्यात येईल, असा व्हिप भाजपचे गटनेते डॉ. मुकेश मुद्ग‌ल यांनी पक्षाच्या नगरसेवकांना बजावला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर गटनेता मुद्ग‌ल कोणती भूमिका बजावतात, याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.