शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला सुवर्ण महोत्सवाची संधी की काँग्रेसला गतवैभव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST

दिनकर ठवळे कोराडी: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोराडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत यावेळी भाजपा विजयाच्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतो की काँग्रेस गतवैभव ...

दिनकर ठवळे

कोराडी: जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोराडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत यावेळी भाजपा विजयाच्या सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करतो की काँग्रेस गतवैभव प्राप्त करते, याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. यावे‌ळी दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गत २० वर्षापासून ही ग्रा.पं. भाजपाच्या ताब्यात आहे. १९९५ पूर्वी कोराडी ग्राम पंचायतमध्ये सतत काँग्रेस गटाचे वर्चस्व राहिले आहे. पुनर्वसित कोराडी ग्रामपंचायतीचा पहिला सरपंच काँग्रेसच्या गटाचा होता. त्यामुळे पूर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी व भाजपाच्या विजयाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल रोखण्यासाठी काँग्रेसचा गट तयारीनिशी मैदानात उतरला आहे. कोराडी जुने गाव वीज केंद्राच्या व आजच्या जगदंबा मंदिर संस्थांच्या मागच्या दिशेला होते. त्या ठिकाणी असताना कोराडीचे सरपंच म्हणून माजी शिक्षण सभापती प्रेमलाल पटेल, दयाराम तडसकर, मधुकर चिंचूळकर, केशवराव समरितकर, महादेवराव बेलेकर आदींनी सरपंचपद भूषवून कोराडीचा मान वाढला आहे. त्यानंतर १९८५ मध्ये पुनर्वसित कोराडी आजच्या ठिकाणी प्रस्थापित झाली. कोराडी पुनर्वसित झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या तत्कालीन महादुला ग्रामपंचायत व कोराडी ग्रामपंचायत यांच्यात सीमा वादाला प्रारंभ झाला. सीमावादाचे हे प्रकरण १९९५ पर्यंत न्यायालयात असल्याने या काळात कोराडी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय राजवट होती. यानंतर १९९५ ला झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस गटाच्या माया डोंगरे या सरपंच झाल्या परंतु १९९८ ला त्यांच्यावर अविश्वास आणून रागिणी रंगारी ह्या सरपंच बनल्या. त्यानंतर २००० पासून आजपर्यंत या ठिकाणी भाजपाचेच सरपंच राहिले. २००० मध्ये विठ्ठल निमोणे, २००५ मध्ये नेहा भोयर अडीच वर्षांसाठी तर पुढील अडीच वर्षांसाठी अनुराधा आमीन, २०१० मध्ये अडीच वर्षांसाठी विठ्ठल निमोने तर त्यानंतर अडीच वर्ष बापू बिरखेडे, २०१५ मध्ये अडीच वर्षासाठी अर्चना मैद तर पुढील अडीच वर्ष सुनिता चिंचूरकर यांनी सरपंचपद भूषविले आहे. २००० पासून आजपर्यंतच्या २० वर्षाच्या काळात याठिकाणी भाजपच्या गटाला बहुमताने सत्ता मिळाली. गत गतवेळी १७ पैकी १७ ही ग्रामपंचायत सदस्य भाजप गटाचे होते. भाजपच्या या ठिकाणचे नेतृत्व माजी ऊर्जामंत्री व चंद्रशेखर बावनकुळे हेच सांभाळत आहेत. काँग्रेसच्या वतीने महासचिव सुरेश भोयर, हुकूमचंद आमधरे, कोराडी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य नाना कंभाले आदी बाजू सांभाळत आहेत.