शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाण

By admin | Updated: December 10, 2015 02:57 IST

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना भाजपमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली.

शेवटच्या क्षणी अर्ज दाखल : भाजपमध्ये रस्सीखेच तर काँग्रेसमध्ये शोधाशोधनागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना भाजपमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली. शेवटी प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांचे नाव निश्चित करण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये एकाही दिग्गज नेत्याने लढण्याची तयारी न दर्शविल्यामुळे शेवटपर्यंत उमेदवाराची शोधाशोध सुरू राहिली. शेवटी शहर कार्यकारिणीचे प्रतिनिधी असलेले अशोकसिंग चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली.भाजपकडून गिरीश व्यास यांच्यासह महापौर प्रवीण दटके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, व्यास हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून दटके यांचा डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेकडून अशोकसिंग चव्हाण यांच्यासह नगरसेवक संजय महाकाळकर यांनीही अर्ज दाखल केला. मात्र, चव्हाण हे अधिकृत उमेदवार असून महाकाळकर हे अर्ज परत घेतील, असे पक्षाचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलेभाजपमध्ये उमेदवारी निश्चित करण्यात बरीच रस्सीखेच झाली. महापौर प्रवीण दटके, माजी आ. अशोक मानकर व गिरीश व्यास यांच्यात टोकाची स्पर्धा झाली. शेवटच्या दिवशी मानकर मागे पडले. दटके की व्यास, अशीच चर्चा सुरू राहिली. अर्ज भरण्याच्या दोन तासापूर्वी यावर तोडगा काढत दोन्ही दटके व व्यास या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करायचा व यानंतर उमेदवारीवर चर्चा होईल, असेही पक्षांतर्गत ठरले. मात्र, यानंतर अर्ध्या तासातच गिरीश व्यास यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे भाजपतर्फे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. गिरीश व्यास हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघाच्या बूथप्रमुख या पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १० वर्षे नगरसेवक, नासुप्रचे विश्वस्त, भाजपचे शहर अध्यक्ष, महामंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत.